अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेला 'आदिपुरुष' हा सिनेमा अखेर आज (१६ जून) सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. पहिल्यादिवशीच या सिनेमाचे शो हाऊसफुल होत आहेत. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच अॅडव्हान्स बुकिंगमधून मोठी कमाई केली आहे. सध्या 'आदिपुरुष' या सिनेमाचा थिएटरमधील एक व्हिडिओ सोशल मीडिवर तुफान व्हायरल झाला आहे.
'आदिपुरुष' सिनेमाच्या टीमकडून चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी चित्रपट गृहातील एक सीट हनुमानासाठी राखीव ठेवण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला होता. या रिकाम्या सीटने देखील चाहत्यांनी लक्ष वेधून घेतलं आहे. आता चित्रपट गृहावर हनुमानासाठी रिकामी ठेवण्यात आलेल्या या सीटची चाहत्यांनी पुजा केली आहे. हा व्हिडिओ एका ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला असून तो सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडिओत चित्रपटगृहातील रिकाम्या सीटवर चाहते हनुमाचा फोटो ठेवून पुजा करताना दिसत आहे. तसंच या प्रतिमेला हळद-कुंकू वाहून पुष्प अर्पण केल्याचं देखील या व्हिडिओत दिसत आहे. एवढच नाही तर या प्रतिमेसमोर प्रसाद म्हणून केळी देखील ठेवल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
मराठमोळ्या ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' या सिनेमात मोठी स्टार कास्ट असून प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत असून प्रभासने रामाची, क्रिती सेनॉनने सीता मातेची तर सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे. मराठी अभिनेता देवदत्त नागे याने हनुमानाची तर मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित शुर्पनखेच्या भूमिकेत आहे.