Tiger 3: 'टायगर 3' पाहून चाहते करणार साजरी दिवाळी ; पहिला शो पहाटे पासून ...

चित्रपट दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये रिलिज होणार आहे. त्यामुळे चित्रपटगृहांनी 'टायगर 3' च्या स्वागताची तयारी लवकर सुरुवात करावी विनंती केली आहे
Tiger 3: 'टायगर 3' पाहून चाहते करणार साजरी दिवाळी ; पहिला शो पहाटे पासून ...

बॉलीवूडच्या भाईजानचा आगामी चित्रपट 'टायगर 3' ची उत्सुकता सर्वांना लागली आहे. 'टायगर 3' हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अवघे काहीच दिवस बाकी आहेत. तरीही चाहत्यांची चित्रपट पाहण्याची उत्सुकता शिगेला जाऊन पोहचली आहे.

सलमान खान - कतरिना कैफ या दोघांच्या मुख्य भूमिका चित्रपटांत आहेत. 'टायगर 3' पाहण्यासाठी लोकं आतापासुनच सज्ज झाले आहेत. अशातच आता 'टायगर 3' च्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. मुंबईत 'टायगर 3' या चित्रपटाचा भल्या पहाटे शो लावण्यात येणार आहे. त्यामुळे 'टायगर ३' पाहून लोकं आपली दिवाळी पहाटे साजरी करणार अशी शक्यता वर्तवली जातं आहे. 'टायगर 3' दिवाळीच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच रविवारी, 12 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. निर्माते यशराज फिल्मन ही माहिती दिली आहे. ते रिलीजच्या तारखेला संपूर्ण देशभरात सकाळी ७ वाजल्यापासून चित्रपटाचं प्रदर्शन सुरू करतील.

तसंच, YRF 5 नोव्हेंबरपासून भारतात 'टायगर 3' या चित्रपटाचं अँडवान्स बुकिंग सुरू करणार आहे. हा चित्रपट दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये रिलिज होणार आहे. त्यामुळे चित्रपटगृहांनी 'टायगर 3' च्या स्वागताची तयारी लवकर सुरुवात करावी विनंती केली आहे.YRF स्पाय युनिव्हर्सचे चाहते स्पॉइलर टाळण्यासाठी 'टायगर 3' चा पहाटेच्या शोला नक्की गर्दी करतील यात शंका नाही. 'टायगर 3' हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ डब आणि तेलुगु डब या भाषांमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. 'टायगर 3' सिनेमा १२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in