Tiger-3 first song: अरजित सिंग धमाका करण्यास सज्ज!  'टायगर-३'च्या पहिल्या गाण्याची घोषणा

Tiger-3 first song: अरजित सिंग धमाका करण्यास सज्ज! 'टायगर-३'च्या पहिल्या गाण्याची घोषणा

'टायगर ३' या चित्रपटातून सलमान खान आणि कतरिना कैफ यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.

बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा(Salman Khan) 'टायगर-३'(Tiger-3) या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसानांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या ट्रेलरने तब्बल २५ मिलीयनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळवले होते. 'टायगर ३' या चित्रपटातून सलमान खान आणि कतरिना कैफ यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.

'टायगर 3' या बहुचर्चित चित्रपटाच्या पहिल्या गाण्याची झलक आज प्रेक्षकांच्या भेटीला आली असून या चित्रपटाने सगळ्यांना वेड लावलं आहे. कतरिनानं तिच्या सोशल मीडिया वर आगामी "लेके प्रभू का नाम" या गाण्याचे पोस्टर शेयर करत पोस्टला "#Tiger3 Party track loading!",असं कॅप्शन दिलं आहे. आमच्या पहिल्या गाण्याची पहिली झलक #LekePrabhuKaNaam हे गाणं 23 ऑक्टोबर रोजी रिलिज होणार आहे. अशी पोस्ट शेअर करत कतरिनानं गाण्याबाबतचा खुलासा केला आहे.

'लेके प्रभू का नाम' हे गाणं अरजित सिंग आणि निखिता गांधी यांनी गायलं आहे. याशिवाय या चित्रपटातलं दुसरं गाण एक रोमँटिक ट्रॅक आहे. ते देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल असं बोललं जातं आहे.

सलमान खानचा हा स्पाय युनिव्हर्सचा हा पाचवा चित्रपट असून हा चित्रपटांत सलमान आणि कतरिना जबरदस्त अॅक्शन करणार असल्याचं दिसून येतं आहे. यावेळी इम्रान हाश्मी या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे आता चाहत्यांची उत्सुकता आणखीच वाढली आहे. 'टायगर 3' हा 12 ऑक्टोबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असून हा चित्रपट तमिळ, तेलगू आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in