Tiger 3 New Promo: 'टायगर 3'ला झिरो कटसह मंजुरी ; निर्मात्यांकडून दुसरा प्रोमो रिलिज

अशातच आता 'टायगर ३' या चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC)कडून देखील परवानगी मिळाली आहे
Tiger 3 New Promo: 'टायगर 3'ला झिरो कटसह मंजुरी ; निर्मात्यांकडून दुसरा प्रोमो रिलिज

बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आणि अभिनेत्री कैतरीना कैफ यांच्या 'टायगर ३' या चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'टायगर ३' हा चित्रपट दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. अशातच आता 'टायगर ३' या चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC)कडून देखील परवानगी मिळाली आहे. त्याचबरोबर CBFC कडून 'टायगर ३' या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद देखील मिळाला आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे 'टायगर 3'ला CBFCने झिरो कटसह मंजुरी दिली आहे.

या चित्रपटातून यावेळी कोणतेही सीन्स काढण्यात आलेले नाहीत. मात्र, काही शब्दात बदल करण्यात आले आहेत. 'बेवकूफ', 'मशरूफ', 'मूर्ख', 'व्यस्त' असे काही शब्द या चित्रपटांतून काढण्यात आलेले आहेत. त्याबरोबर चित्रपटात ज्या ठिकाणी RAW या शब्दाचा उपयोग केला आहे. त्याठिकाणी निर्मात्यांना R&AW करण्यास सांगितलं आहे. यासोबत आता चित्रपटाला U/A प्रमाणपत्र देण्यातं आलं आहे. 'टायगर ३' हा चित्रपट 2 तास 22 मिनिटांचा असणार आहे.

याच पाश्वर्भूमीवर निर्मात्यांनी 'टायगर ३' चा दुसरा प्रोमो शेयर केला आहे. या प्रोमोमध्ये सलमान कतरिनाच्या अ‍ॅक्शन सीन्ससोबत इम्रान हाश्मीने देखील आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. 'टायगर ३' या चित्रपटात सलमान खान कैतरीना कैफ यांच्यासह इम्रान हाश्मी देखील दिसणार आहे. हा चित्रपट १२ नोव्हेंबरला चित्रपटगृहातं प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे शो सकाळी 7 वाजल्यापासून सुरु होणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in