सलमान खानचा 'टायगर 3' ओटीटीवर; जाणून घ्या, कधी अन् कुठे पाहता येईल सिनेमा

दिवाळीच्या मुहूर्तावर हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. यानंतर आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होत आहे.
सलमान खानचा 'टायगर 3' ओटीटीवर; जाणून घ्या, कधी अन् कुठे पाहता येईल सिनेमा

बॉलीवूडचा भाईजान सलमान खान याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'टायगर 3' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज झाला आहे.

'टायगर 3' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा महेश शर्मा यांनी सांभाळली होती. दिवाळीच्या मुहूर्तावर हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. यानंतर आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होत आहे.

आज(7 जानेवारी) 'टायगर 3' हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांना 'ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ'वर पाहायला मिळणार आहे. 'ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ'ने 'टायगर 3' सिनेमाचे पोस्टर शेअर करत हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाल्याची घोषणा केली आहे. सलमान खानने देखील हा सिनेमा ओटीटीवर आल्याची घोषणा केली आहे.

या सिनेमात सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांच्या मुख्य भूमिका आहेत. यशराज फिल्मच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 'टायगर 3' या सिनेमाआधी 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.

'टायगर 3' या सिनेमाने भारतात 282.79 कोटींची कमाई केली, तर जगभरात या सिनेमाने 464 कोटींचा गल्ला जमवला आहे. सलमान खानच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसांपासून भाईजानचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी करत आहेत. आता त्याचा कोणता सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवणार याकडे सिनेरसिकांचे लक्ष लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in