Tiger 3 Trailer Out : सर्वत्र फक्त भाईजानची हवा ; 'टायगर ३'चा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

सलमान खानच्या चाहत्यांना 'टायगर ३'च्या माध्यामतून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर हा थरार अनुभवायला मिळणार आहे.
Tiger 3 Trailer Out : सर्वत्र फक्त भाईजानची हवा ; 'टायगर ३'चा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि कतरिना कैफच्या 'टायगर ३' च्या ट्रेलरच्या ट्रेलरची प्रेक्षक आतूरतेने वाट पाहत होते. कालपासूनच सोशल मीडियावर टायगर ३ ट्रेंड होत होता. अनेक वर्षानंतर टायगर ३ च्या माध्यामातून एकत्र दिसणार होती. या दोघांनी आतापर्यंत 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंगा है' असे दोन बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले होते. आता त्यांच्या चाहत्यांना 'टायगर ३'च्या माध्यामतून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर हा थरार अनुभवायला मिळणार आहे.

लवकरच सलमान आणि कतरिनाच्या चाहत्यांची प्रतिक्षा संपुष्टात येणार आहे. निर्मात्यांनी 'टायगर 3'चा ट्रेलर रिजील केला आहे. १६ ऑक्टोबर रोजी सलमान खानच्या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर टायगरवर गद्दार असल्याचा शिक्का का बसला आणि आता तो देशद्रोही आहे की देशभक्त असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडले होते.

हा ट्रेलर बघीतल्यानंतर काही प्रश्नाची उत्तरे मिळत आहेत. टिझरमध्ये सलमानचा लूक रिव्हिल करण्यात आला होता. मात्र आता ट्रेलरमध्ये सलमान सोबत कतरिनाची देखील झलक पहालया मिळत आहे. तर यावेळी इमरान हाश्मी हा व्हिलनच्या रुपात पहायला मिळाला आहे. रिलीज झाल्यानंतर काही वेळातच हा ट्रेलन सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. आता सलमान खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते कमालीचे उत्सूक झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर सर्वत्र भाईजानच्या 'टायगर ३'ची हवा दिसून येत आहे.

या चित्रपटात सलमान खान, कतरिना कैफ आणि व्हिलन म्हणून इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय शाहरुख खानची देखील या सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका आहे. तसंच ज्यूनियर एनटीआरच्या नावाची देखील चर्चा सुरु आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in