
बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या 'टायगर 3' (Tiger 3) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. रिलीजच्या सात दिवसांत या सिनेमने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. जगभरात या सिनेमाचा बोलबाला असून ३०० कोटींच्या क्लबमध्ये या सिनेमाची एन्ट्री झाली आहे.
'टायगर 3' (Tiger 3)या सिनेमाला प्रेक्षाकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. रिलीजच्या सात दिवसांत या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. जगभरात या सिनेमाने ३०० कोटींचा टप्पा पार केला आहे. यात २०० कोटींचा गल्ला या चित्रपटाने भारतात जमवला आहे.
१२ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला 'टायगर 3' (Tiger 3)या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी ४४.५ कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी ५९.२५ कोटी, तिसऱ्या दिवशी ४४.३ कोटी, चौथ्या दिवशी २१.१ कोटी. पाचव्या दिवशी १८.५ कोटी , सहाव्या दिवशी १३.४४ कोटी, सातव्या दिवशी ३.९ कोटींची कमाई या चित्रपटाने केली आहे. एकूण सात दिवसांची कमाई बघता 'टायगर 3' (Tiger 3) ने आतापर्यंत भारतात २०४.१८ कोटींची कमाई केली आहे. जगभरात या सिनेमाने आतापर्यंत ३०० कोटींवर मजल मारली आहे.
ओटीटीवर होणार रिलीज
अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफचा 'टायगर 3' (Tiger 3) हा बिग बजेट सिनेमा आहे. सिनेमागृहात गृहात धुमाकुळ घङातल्यानंतर हा सिनेमा अॅमेझॉल प्राईम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात 'टायगर 3' (Tiger 3) हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होण्याची शक्यता आहे.