कॉमेडी, मनोरंजनाचा तडका असलेला 'टाइमपास ३' ओटीटीवर

चित्रपटाने नुकतेच पार पडलेल्या 'झी कॉमेडी अवॉर्ड्स' मध्ये अनेक पुरस्कारांवर नाव कोरले आहेत.
कॉमेडी, मनोरंजनाचा तडका असलेला 'टाइमपास ३' ओटीटीवर

झी स्टुडिओज निर्मित 'टाइमपास ३' चित्रपट २९ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. चित्रपटात मुख्य भूमिकेत हृता दुर्गुळे, प्रथमेश परब, भाऊ कदम, वैभव मांगले, संजय नार्वेकर यांच्यासह इत्यादी कलाकारही मुख्य भूमिकेत होते. येत्या १६ सप्टेंबर रोजी 'झीफाइव्ह' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'टाइमपास ३' झळकणार आहे. 'पांडू', 'झोंबिवली' आणि 'धर्मवीर'च्या ओटीटीच्या यशस्वी प्रिमियरनंतर 'टाइमपास ३' ओटीटीवर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

चित्रपटाने नुकतेच पार पडलेल्या 'झी कॉमेडी अवॉर्ड्स' मध्ये अनेक पुरस्कारांवर नाव कोरले आहेत. यात अनुक्रमे सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट लेखक- प्रियदर्शन जाधव आणि रवी जाधव तर सर्वोत्कृष्ट कलाकार- हृता दुर्गुळेने पुरस्कारावर आपले नाव कोरले. रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास'च्या पहिल्या भागात दगडू व प्राजक्ता या दोन शाळकरी वयातील मुलांची प्रेमकहाणी दाखविण्यात आली असून प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर यांनी या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. 'टाइमपास २' चे कथानक १५ वर्षांनी घडते असे दाखवले होते. चित्रपटामध्ये प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

'टाइमपास ३' या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.३ इतके मानांकन मिळाले आहे. प्रेक्षकांसाठी मनोरंजनाने परिपूर्ण असलेल्या 'टाइमपास ३' चित्रपटात विनोद व रोमान्स भरपूर आहे. अथांश कम्युनिकेशन आणि झी स्टुडियोजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचा १६ सप्टेंबर रोजी 'झीफाइव्ह' वर प्रीमिअर होणार आहे.

'टाइमपास ३' हा चित्रपट माझ्या अत्यंत जवळचा चित्रपट आहे आणि या चित्रपटात काम करणे म्हणजे घरी परतल्यासारखे होते. या निखळ मनोरंजन करणाऱ्या चित्रपटाचा मी एक भाग आहे, याचा मला आनंद आहे आणि आता या चित्रपटाच्या डिजिटल प्रीमिअरसह आम्ही १९०हून अधिक देशांतील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचू. कारण ही 'झीफाइव्ह' ची ताकद आहे.

- प्रथमेश परब, अभिनेता

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in