TJMM : रणबीर आणि श्रद्धाची पहिल्यांदाच केमिस्ट्री ; पाहा संपूर्ण व्हिडिओ

हा एक रोमँटिक कॉमेडी मसाला चित्रपट असून चित्रपट 2023 मध्ये रिलीज होणार आहे
TJMM : रणबीर आणि श्रद्धाची पहिल्यांदाच केमिस्ट्री ; पाहा संपूर्ण व्हिडिओ

'ब्रह्मास्त्र'च्या यशानंतर रणबीर कपूर लवकरच एका चित्रपटात नवीन रोलमध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तो पहिल्यांदाच अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करत आहे. नुकतीच या चित्रपटाची एक झलक प्रदर्शित झाली असून ती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दरम्यान पोस्टरवर 'TJMM' असे लिहिले आहे. दिग्दर्शक लव रंजन यांनी चित्रपटाच्या नावाची घोषणा केली असून चित्रपटाचे नाव आहे 'तू झुठी मैं मक्कार' असे आहे. या चित्रपटाचा टीझरही समोर आला आहे, ज्यामध्ये रणबीर आणि श्रद्धाची केमिस्ट्री चांगलीच पाहायला मिळते. हा एक रोमँटिक कॉमेडी मसाला चित्रपट असून चित्रपट 2023 मध्ये रिलीज होणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक लव रंजन यांनी 'प्यार का पंचनामा', 'सोनू के टीटू की स्वीटी' सारखे चित्रपट दिले आहेत जे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. आता या चित्रपटासाठी चाहते उत्सुक आहेत. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in