'आज मी श्रीमंत झालो...हे खरे हिरो'; 12th Fail आयपीएस मनोज शर्मांना भेटल्यावर महिंद्रांची पोस्ट व्हायरल

7 फेब्रुवारी रोजी आनंद महिंद्रा यांनी IPS मनोज शर्मा आणि त्यांची पत्नी IRS श्रद्धा जोशी यांची भेट घेतली
'आज मी श्रीमंत झालो...हे खरे हिरो'; 12th Fail आयपीएस मनोज शर्मांना भेटल्यावर महिंद्रांची पोस्ट व्हायरल

12th Fail हा सिनेमा रिलीज झाल्यापासून IPS मनोज शर्मा यांच्याबद्दलची चर्चा काही संपत नाहीये. सर्वसामान्यांपासून ते व्हीआयपी लोकांपर्यंतही त्यांच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे. आता या लोकांमध्ये महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांचेही नाव जोडले गेले आहे. 7 फेब्रुवारी रोजी आनंद महिंद्रा यांनी IPS मनोज शर्मा आणि त्यांची पत्नी IRS श्रद्धा जोशी यांची भेट घेतली आणि त्यानंतर 'आज मी आणखी श्रीमंत झालो' अशा आशयाची पोस्ट करत 'हेच देशाचे खरे हिरो आहेत' अशा शब्दांत कौतुकाचा वर्षावही केला.

आनंद महिंद्रांची पोस्ट-

"मी त्यांना स्वाक्षरीसाठी विनंती केली तेव्हा ते लाजले, जी (स्वाक्षरी) मी सध्या अभिमानाने हाती घेतली आहे. मनोज कुमार शर्मा, आयपीएस आणि त्यांची पत्नी श्रद्धा जोशी, आयआरएस हे वास्तविक जीवनातील खरे नायक आहेत. #12thFail हा चित्रपट या असाधारण जोडप्याच्या जीवनावर आधारित आहे. आज दुपारच्या जेवणाच्या वेळी हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याचे मला कळले. आजही ते प्रामाणिक जीवन जगण्याचा त्यांचा आदर्श पाळतात. भारताला जागतिक महासत्ता बनायचे असेल, तेही झपाट्याने, तर अधिकाधिक लोकांना त्यांच्या राहणीमानाचा अवलंब करावा लागेल". आनंद महिंद्रा यांनी पुढे लिहिले की, IPS मनोज कुमार शर्मा आणि त्यांची पत्नी IRS श्रद्धा जोशी हे देशाचे खरे सेलिब्रिटी आहेत आणि त्यांची स्वाक्षरी मिळणे हा बहुमान आहे. त्यांना भेटल्यामुळे मी आज एक श्रीमंत माणूस झालो.

12th fail हा चित्रपट मनोज शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे. यामध्ये मनोज शर्मा यांची भूमिका बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीने साकारली आहे. हा चित्रपट २७ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटासाठी विक्रांतला उत्कृष्ट अभिनयाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. यामध्ये आयपीएस मनोज शर्मा व त्यांच्या संघर्षाची कहाणी दाखवण्यात आलेली आहे.

logo
marathi.freepressjournal.in