Tunisha Suicide case : 'पैशासाठी मुलीला...'; शिझान खानच्या बहिणीच्या आरोपांनी प्रकरणात नवा ट्विस्ट

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात (Tunisha Suicide case) आणखी एक ट्विस्ट आला आहे. शिझान खानच्या बहिणीने पत्रकार परिषद घेत केले गंभीर आरोप
Tunisha Suicide case : 'पैशासाठी मुलीला...'; शिझान खानच्या बहिणीच्या आरोपांनी प्रकरणात नवा ट्विस्ट

टीव्ही मालिका अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात तिचा सहकलाकार शिझान खानला पोलिसांनी अटक केली. यावेळी तुनिषाच्या आईने त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप केले. यानंतर आता या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आला असून शिझान खानची बहीण फलक नाजने पत्रकार परिषद घेत तुनिषाच्या आईवर गंभीर आरोप केले आहेत. 'तुनिषा आणि तिच्या कुटुंबाचे संबंध चांगले नव्हते.' असा दावा फलक नाजने पत्रकार परिषदेत केला आहे.

शिझानची बहीण फलक नाराज म्हणाली की, "तुनिषाच्या आईने लावलेले सर्व आरोप खोटे आहेत. तिच्या आईची फक्त तुनिषाच्या पैशांवरच नजर होती. तुनिषाची मानसिक स्थीती खुप खराब होती. तिची आई फक्त पैशांसाठी मुलीवर दबाब टाकत होती. शिझान आणि तुनिषामध्ये चांगले मैत्रीणचे नाते होते. त्यांचे नाते हे तुनिषाच्या आई मान्य नव्हते. तिची आई कामासाठी नेहमी तिच्यावर दबाव टाकत होती. अल्बमच्या गाण्यासाठी तिच्या आईने तुनिषाची जबरदस्तीने सही घेतली होती." शिझानच्या कुटुंबीयांनी केलेल्या या आरोपांमुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in