Urfi Javed : ... तरीही माझा 'नंगानाच' चालूच राहणार; उर्फी जावेदने टीका करणाऱ्यांना दिले उत्तर

अगदी काही दिवसांपूर्वी भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फी जावेदच्या (Urfi Javed) वेषभूषेवर टीका करत तिच्याविरुद्ध तक्रार केली होती.
Urfi Javed : ... तरीही माझा 'नंगानाच' चालूच राहणार; उर्फी जावेदने टीका करणाऱ्यांना दिले उत्तर
Published on

गेल्या काही दिवसांपासून मॉडेल, अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) चांगलीच चर्चेत आली आहे. भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी तिच्या अंगप्रदर्शनावर आक्षेप घेत तिच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. चित्रा वाघ यांनी, "असा 'नंगानाच' आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही." असा इशारा दिला होता. अशामध्ये आता उर्फी जावेदने स्वतः या सगळ्यावर प्रतिक्रिया देत चित्रा वाघ यांना न जुमानता अप्रत्यक्षपणे त्यांना टोला लगावला आहे. मुंबई विमातळावर जाताना तिने, माझा 'नंगानाच' चालूच राहणार, असे म्हणत मोठे आव्हान दिले आहे. त्यामुळे आता हा वाद चिघळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री उर्फी जावेदचा एक व्हिडीओ वायरल होत आहे. यामध्ये तिला पापाराझींनी विचारले की, 'तू तुझ्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांना काय संदेश देशील?' असे विचारताच तिने, 'प्रेमाचं माहित नाही, पण मी माझा नंगानाच सुरूच ठेवणार आहे.' असे उत्तर देत पुढे निघून गेली. त्यामुळे अप्रत्यक्षपणे तिने चित्रा वाघ यांना टोला लगावला आहे, असेच दिसते. तिच्या या उत्तरानंतर आता चतुरा वाघ यांची काय प्रतिक्रिया येते? याकडे साऱ्यांचे लक्ष नक्कीच असेल.

logo
marathi.freepressjournal.in