
आपल्या वेगळ्या फॅशनमुळे मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते. मात्र, यावेळी ती चर्चेत आली आहे ते तिने बॉलिवूड स्टार रणबीर कपूरबद्दल केलेल्या विधानामुळे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री करीना कपूरने उर्फी जावेदचे कौतुक केले होते. तर, याउलट रणबीरने एका मुलाखतीमध्ये, 'उर्फीची फॅशन सेन्समधील निवड वाईट आहे,' असे विधान केले होते. यावरून मॉडेल उर्फी जावेदने केलेल्या विधानाची चांगलीच चर्चा झाली होती.
एका मुलाखतीमध्ये उर्फीला करीना कपूरने केलेल्या कौतुकाबद्दल विचारले असता उर्फीने करीनाचे आभार मानले होते. तर, रणबीर कपूरच्या विधानावर ती म्हणाली की, "रणबीर कपूर गेला खड्ड्यात, माझे कौतुक करीना कपूरने केले तेच खूप आहे. असाही करीनासमोर रणबीर कपूरची काय लायकी आहे." असे वक्तव्य केले होते. उर्फीने हे विचार केल्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर अनेकांनी टीका केली. मात्र, त्यानंतर उर्फीने स्वतः यावर स्पष्टीकरणही दिले.
उर्फी जावेदने एका बातमीचा फोटो शेअर केला. यावेळी ती आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना म्हणाली की, "मी असा काहीच बोलले नाही. मी त्यावेळेस मस्करीत बोलले होते की, करीनाने कौतुक केले आहे तर आता काय रणबीर गेला खड्ड्यात. हे मी अत्यंत मस्करीत बोलले होते. रणबीरने जे काही मत मांडले, तो त्याचा दृष्टिकोन. त्यामध्ये काहीच द्वेषभावना नसून खरोखरच रणबीर कपूरची लायकी काढण्याचा माझा हेतु नव्हता." असे स्पष्टीकरण दिले.