Nawazuddin Siddiqui: उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी नवाजुद्दीन सिद्दीकीचा सत्कार केला

नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा एक प्रतिभावान अभिनेता असून, त्याच्या बहुमुखी भूमिकांसाठी तो प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे.
Nawazuddin Siddiqui: उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी नवाजुद्दीन सिद्दीकीचा सत्कार केला
Published on

नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी उत्तराखंडमध्ये आहे. हे समजताच, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी नवाजुद्दीन सिद्दीकीला आपल्या घरी 'डिनर' साठी बोलावले. तसेच, पांढरी शाल आणि रोप देऊन नवाजुद्दीन सिद्दीकीचे स्वागत केले.

नवाजुद्दीन सिद्दीकी हा एक प्रतिभावान अभिनेता असून, त्याच्या बहुमुखी भूमिकांसाठी तो प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या सत्कारचे काही फोटो अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर करून आभार व्यक्त करत कॅप्शनमध्ये लिहिले, "उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचे प्रेम आणि आदरासाठी आभार".

नवाजुद्दीन सध्या 'हड्डी'मधील त्याच्या लूकमुळे सर्वत्र चर्चेत असतानाच, त्याला ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत पाहण्यासाठी दर्शकांची उत्कंठा बांधली आहे. दरम्यान, वर्कफ्रंटवर, 'हड्डी' व्यतिरिक्त, नवाजकडे 'टिकू वेड्स शेरू', 'नूरानी चेहरा' आणि 'अदभूत' या चित्रपटांची एक मनोरंजक लाइनअप आहे.

logo
marathi.freepressjournal.in