
राजीव बर्नवाल आणि जसपाल सिंग संधूद्वारा लिखित आणि दिग्दर्शित 'वध' या चित्रपटाचा टीझर पोस्टर अखेर प्रदर्शित झाला. तसेच, या चित्रपटात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता या दिग्गज कलाकारांना आपल्याला पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. 'वध' हा चित्रपट थ्रिलर-ड्रामा असून, टीझर पोस्टर त्याचे समर्थन करतो.
'वध' हा चित्रपट राजीव बर्नवाल आणि जसपाल सिंग संधूद्वारा लिखित आणि दिग्दर्शित असून, जे स्टुडिओ आणि नेक्स्ट लेव्हल प्रॉडक्शनने याची निर्मिती केली आहे. तसेच, लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे. हा चित्रपट ९ डिसेंबर २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.