'वाळवी'च्या यशानंतर दिग्दर्शकाने केली मोठी घोषणा; म्हणाला...

परेश मोकाशी दिगदर्शित आणि स्वप्नील जोशी, अनिता दाते, सुबोध भावे अभिनित वाळवी या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले
'वाळवी'च्या यशानंतर दिग्दर्शकाने केली मोठी घोषणा; म्हणाला...

नुकतेच प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांमध्ये 'वाळवी' हा चित्रपट चांगलाच गाजत आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ या पहिल्या मराठी थ्रिलकॉम चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चौथ्या आठवड्यातही प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला. हेच यश साजरे करण्यासाठी चित्रपटाच्या टीमकडून पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये दिग्दर्शक परेश मोकाशीने 'वाळवी २'ची घोषणा केली. त्यामुळे आतापासून या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.

याबद्दल 'वाळवी' चित्रपटाच्या निर्माती मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या की, "वाळवी चित्रपट प्रेक्षकांना आवडतो आहे. त्यांच्याकडून चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. म्हणूनच आम्हाला वाळवी २ची प्रेरणा मिळाली. वाळवीमध्ये ज्याप्रकारे अनेक गोष्टी अनपेक्षित होत्या, त्यापेक्षाही अधिक सस्पेन्स आणि थ्रील वाळवी २मध्ये असणार आहे. सध्या तरी हे सगळे गुपित आहे. तसेच, झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी या सीक्वेलबद्दल म्हणाले की, “या यशामध्ये दिग्दर्शक, कलाकार, पडद्यामागील संपूर्ण टीम यांच्यासोबतच मीडियाचाही तितकाच सहभाग आहे. मीडियाने वेळोवेळी प्रेक्षकांपर्यंत वाळवीला पोहोचवले. लवकरच आता वाळवी २ हा थ्रीलकॉम घेऊन तुमच्या भेटीला येऊ.”

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in