वरुण धवन - जान्हवी कपूर पुन्हा 'या' सिनेमात एकत्र दिसणार; करण जोहरने केली नव्या चित्रपटाची घोषणा

वरुण धवन - जान्हवी कपूर पुन्हा 'या' सिनेमात एकत्र दिसणार; करण जोहरने केली नव्या चित्रपटाची घोषणा

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर बॉलिवू़डमधील लोकप्रिय कलाकार आहेत.

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर बॉलिवू़डमधील लोकप्रिय कलाकार आहेत. २०२३ च्या ‘बवाल’ चित्रपटानंतर वरुण आणि जान्हवीची जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. धर्मा प्रोडक्शनच्या ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’या आगामी चित्रपटाद्वारे हे दोघेही प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येणार आहेत. या प्रेमकथेची निर्मिती करण जोहर करणार आहे.

२२ फेब्रुवारीला धर्मा प्रोडक्शनच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात झाली. या सिनेमाचे दिग्दर्शन शशांक खेतान करणार आहे. ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ आणि ‘धडक’ यासह त्याने अनेक चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

या चित्रपटाच्या घोषणेची पोस्ट शेअर करत “तुमचा ‘सनी संस्कारी’ ‘तुलसी कुमारी’ला मिळवण्याच्या मार्गावर आहे! मनोरंजनाने गुंफलेली ही प्रेमकथा मोठ्या पडद्यावर लवकरच येत आहे!”, असे कॅप्शन लिहिले होते. हा चित्रपट १५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यात वरुण ‘सनी संस्कारी’ची मुख्य भूमिका साकारणार आहे तर जान्हवी ‘तुलसी कुमारी’च्या भूमिकेत दिसेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in