Ved Movie : 'वेड'च्या दुसऱ्या भागाबद्दल काय म्हणाला रितेश देशमुख?

कोट्यवधींची कमाई करणाऱ्या रितेश देशमुखच्या मराठी 'वेड'बद्दल (Ved Movie) केली मोठी घोषणा
Ved Movie : 'वेड'च्या दुसऱ्या भागाबद्दल काय म्हणाला रितेश देशमुख?

प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनीलिया देशमुखचा ‘वेड’ हा मराठी चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट ५० कोटी रुपयांचा टप्पा पार करेल. अशामध्ये रितेशने या चित्रपटाबद्दल आणखी एक मोठी घोषणा केली आहे. २० तारखेला हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होणार असून यावेळी यामध्ये ३ नव्या सीन्ससह १ गाणेदेखील जोडण्यात आले आहे. यादरम्यान, त्याला एका चाहत्याने या चित्रपटचा दुसरा भाग येणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर त्याने यावर दिलखुलासपणे उत्तर दिले.

'वेड'ला मिळालेल्या यशाबद्दल त्याने प्रेक्षकांचे आभार मानण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी इन्स्टाग्राम लाईव्ह केले. यावेळी एका चाहत्याने त्याला 'वेड' दुसऱ्या भागाबद्दल प्रश्न विचारला. तेव्हा तो म्हणाला की, "सध्यातरी याबद्दल काही विचार केलेला नाही. ‘वेड’ चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.” असे म्हणत त्याने स्पष्ट केले. मात्र, सर्व प्रेक्षकांनी 'वेड'चा दुसरा भाग घेउन यावा अशी मागणी करत आहेत. हा चित्रपट बॉलिवूडला मागे टाकत गेले काही दिवस मोठा पडदा गाजवत आहे. आत्तापर्यंत तिसऱ्या आठवड्यापर्यंत वेडने ४७.६६ कोटींची दमदार कमाई केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in