Ved Movie : 'वेड'साठी रद्द केले सर्कस, अवतार २चे शो; सलग दुसऱ्या आठवड्यात हाऊसफुलचा बोर्ड

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांचा 'वेड' (Ved Movie) हा मराठी चित्रपट सलग दहाव्या दिवशीही तुफान कमाई करत आहे.
Ved Movie : 'वेड'साठी रद्द केले सर्कस, अवतार २चे शो; सलग दुसऱ्या आठवड्यात हाऊसफुलचा बोर्ड

मराठीमध्ये चित्रपट चालत नाहीत, प्रेक्षक वळत नाहीत, या तक्रारी अनेकदा आपल्या मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये ऐकायला येतात. पण, सध्या बॉक्स ऑफिसचे चित्र थोडे वेगळे दिसत आहे. नवीन वर्षात मराठी चित्रपटांची दणक्यात सुरुवात झाली आहे. अभिनेता रितेश देशमुख (Ritiesh Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) 'वेड' (Ved Movie) हा मराठी चित्रपट तुफान कमाई करत आहे. हा चित्रपट ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झाला. त्यानंतर आज दहाव्या दिवशीही चित्रपटाला हाउसफुल गर्दी पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत अंदाजे ३० कोटींहून अधिक कमाई केली आहे. विशेष म्हणजे, काही ठिकाणी बॉलिवूडचा 'सर्कस' आणि हॉलिवूडचा 'अवतार २' या चित्रपटांचे शो कमी करून 'वेड'चे शो वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे आता मराठी चित्रपटांही सुगीचे दिवस आले, असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.

'वेड' हा चित्रपट ३० डिसेंबरला प्रदर्शित झाला. त्यावेळेस या चित्रपटाला तब्बल २.२५ कोटींचा गल्ला केला. तर पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने तब्बल २०.६७ कोटींची कमाई केली. एवढंच नव्हे तर, अनेकदा मराठी चित्रपट हे पहिल्याच आठवड्यात बाहेर पडतात. पण, या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यामध्ये अधिक कमाई केली. दुसऱ्या शुक्रवारी या चित्रपटाने २.५२ कोरी कमावले. तर, दुसऱ्या शनिवारी या चित्रपटाने तब्बल ४.५३ कोटींची कमाई केली. ९व्या दिवशी या चित्रपटाने तब्बल २७.७२ कोटी कमावले. दहाव्या दिवशी म्हणजे दुसऱ्या रविवारी हा चित्रपट अनेक ठिकाणी हाऊसफुल जात असून कमाईचा एकदा ५ कोटींवर जाण्याचा अंदाज आहे. म्हणजेच फक्त २ आठवड्यामध्ये हा चित्रपट ३० कोटींहून अधिकची कमाई करणार असून 'वेड' ब्लॉकब्लस्टर घोषित करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in