ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांचा पुण्यभूषण पुरस्कार २०२३ ने होणार सन्मान

सलग ३३ वर्षे संस्थेने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभरात आणि देशाबाहेरही देण्याचा भव्य उपक्रम राबवला आहे
ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांचा पुण्यभूषण पुरस्कार २०२३ ने होणार सन्मान

पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे गेल्या ३३ वर्षांपासून दिला जाणारा आणि देश-विदेशात प्रतिष्ठेचा मानला जाणारा पुण्यभूषण पुरस्कार २०२३ हा ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना जाहीर झाला आहे. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने आगाशे यांची या पुरस्कारासाठी निवड केल्याचे डॉ. त्याचबरोबर सीमेवर लढताना जखमी झालेल्या जवानांचाही सन्मान करण्यात येणार आहे. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार वितरण सोहळा जुलै महिन्यात होणार असून यंदाचे ३४ वे वर्ष आहे.

सलग ३३ वर्षे संस्थेने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभरात आणि देशाबाहेरही देण्याचा भव्य उपक्रम राबवला आहे. स्मृतीचिन्ह आणि रोख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यासोबतच कर्तव्य बजावताना जखमी झालेल्या ५ जवानांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात येणार आहे. खलाशी राधाकृष्णन, कॉन्स्टेबल पंजाब एन. वाघमारे, नाविक सुदाम बिसोई, गनर उमेंद्र एन. आणि लान्स नाईक निर्मल कुमार छेत्री यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याआधी विविध क्षेत्रात अतुलनीय योगदान देऊन पुण्याचे नाव जगभर पसरवणाऱ्या ३३ ज्येष्ठ पुणेकरांचा गौरव करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in