
मराठी चित्रपट विश्वातील दिग्गज अभिनेते गिरीश ओक यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गिरीश ओक यांचे वडील रत्नाकर दिनकर ओक यांचं काल निधन झालं. त्यांनी वयाच्या ९३ वर्षी अखेर चा श्वास घेतला.
गिरीश यांच्या वडिलांनी वीज महामंडळात शासकीय अधिकारी म्हणुन काम केलं होतं. त्याचा स्वभाव आणि त्यांनी दिलेल्या प्रेमामुळे, वागणूकीमुळे त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. वडिलांच्या निधनानंतर गिरीश ओक यांनी एक भावुक पोस्ट सोशल मीडियावर शेयर करत वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी वडिल रत्नाकर ओक यांचा एक फोटो शेयर करुन वडिलांच्या निधनाची बातमी दिली. गिरीश ओक यांच्या वडिलांचं निधन हे वृद्धापकाळाने झाले आहे. त्यांचे चाहत्यांनी देखील त्यांनी केलेल्या पोस्टवर प्रतिक्रिया देत त्यांच्या वडिलांना श्रध्दांजली वाहीली.
गिरीश ओक यांची पोस्ट
अभिनेते गिरीश ओक यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "काल माझे बाबा श्री. रत्नाकर दिनवकर ओक ह्यांचं वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धत्वामुळे निधन झालं. प्रत्येक मुलाचे/मुलीचे वडील हे त्यांचे पहिले हिरो असतात. तसंच तेही माझे होते."
"माझ्यात काही थोड्याफाक तथाकथिक बऱ्या सवयी गोष्टी आहेत. त्या त्यांच्यामुळेच. ते इलेक्ट्रिकल इंजीनीअर होते आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात चीफ इजीनीअर ह्या पदावर १९८९ साली सेवा निवत्त झाले. त्यांची त्यांच्या हयातीत कधीही भ्रष्टाचार केला नाही."
गिरीश ओक यांच्या वडिलांच्या निधनाने त्यांच्या परिरावारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या वडिलांना त्यांच्या चाहत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली असून चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.