मराठी सृष्टीतील सुवर्णकाळ गाजवणाऱ्या 'या' ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन

मराठी सिनेसृष्टीच्या सुवर्णकाळात या अभिनेत्रीने १९५०चे दशक गाजवले होते
मराठी सृष्टीतील सुवर्णकाळ गाजवणाऱ्या 'या' ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन
Published on

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये १९५०चे दशक गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे आज निधन झाले. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेली तब्बल दीड वर्ष त्यांच्यावर मुलुंड येथील सरला नर्सिंग होममध्ये उपचार सुरु होते. मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळात त्यांनी साकारलेल्या भूमिका या आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. १९५२मध्ये आलेल्या ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पहिले पाऊल ठेवले होते. अगदी काही दिवसांपूर्वी त्यांची बहीण रेखा कामत यांचेदेखील वृद्धापकाळाने निधन झाले.

अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे खरे नाव कुसुम सुखटणकर. त्यांची बहीण अभिनेत्री रेखा कामत म्हणजेच कुमूद सुखटणकर या दोघींनी एकाच चित्रपटामधून पदार्पण केले. चित्रा नवाथे यांनी लाखाची गोष्ट, वहिनीच्या बांगड्या, गुळाचा गणपती, बोलविता धनी, उमज पडेल तर, राम राम पाव्हणं, मोहित्यांची मंजुळा, अगडबम अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तसेच, अनेक नाटकांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या व्यक्तिरेखाही साकारल्या. त्यांनी २००८मध्ये वयाच्या ७८व्या वर्षी 'टिंग्या' चित्रपटात साकारलेली भूमिका ही चांगलीच गाजली. तसेच, २००९मध्ये बोक्या सातबंडे या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in