ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे निधन

कोल्हापूरमधील मंगळवार पेठेतील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला
ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे निधन

कोल्हापूर : मोहित्यांची मंजुळा, सवाल माझा ऐका अशा अनेक चित्रपटांतील भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या स्मरणात राहिलेल्या ज्येष्ठ मराठी अभिनेत्री शांता तांबे यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या. कोल्हापूरमधील मंगळवार पेठेतील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तांबे यांनी मराठी नाट्यसृष्टीतून त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात केली आणि नंतर चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. भालजी पेंढारकर, दिनकर पाटील, अनंत माने यांसारख्या प्रख्यात दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केले. मोहित्यांची मंजुळा, सवाल माझा ऐका, मोलकरीण, मर्दानी, बाई मोठ्या भाग्याची, दोन बायका फजिती ऐका, चांडाळ चौकडी, असला नवरा नको ग बाई, सोंगाड्या, चंदनाची चोळी आदी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका गाजल्या.

logo
marathi.freepressjournal.in