Smriti Biswas: ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्वास यांचे वयाच्या १०० व्या वर्षी निधन

हिंदी, मराठी आणि बंगाली चित्रपटांमधून विविध भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्वास यांचे नाशिकमध्ये बुधवारी रात्री राहत्या घरी निधन झाले. त्या १०० वर्षांच्या होत्या.
Smriti Biswas: ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्वास यांचे वयाच्या १०० व्या वर्षी निधन
Hansal Mehta/Instagram

नाशिक : हिंदी, मराठी आणि बंगाली चित्रपटांमधून विविध भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्वास यांचे नाशिकमध्ये बुधवारी रात्री राहत्या घरी निधन झाले. त्या १०० वर्षांच्या होत्या.

स्मृती विश्वास यांनी बालकलाकार म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी गुरुदत्त, व्ही. शांताराम, मृणाल सेन, बिमल रॉय, बी. आर. चोप्रा आणि राज कपूर यांच्यासारख्या दिग्गजांसमवेत काम केले. त्याचप्रमाणे देव आनंद, किशोरकुमार आणि बलराज साहनी यांच्यासारख्या मातब्बर अभिनेत्यांसमवेतही त्यांनी काम केले. 'संध्या' (१९३०) या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले, तर १९६० मध्ये प्रदर्शित झालेला 'मॉडेल गर्ल' हा त्यांचा अखेरचा हिंदी चित्रपट होता.

logo
marathi.freepressjournal.in