'डॉन 3' ची घोषणा करत व्हिडिओ रिलीज ; रणवीर सिंगने घेतली शाहरुखची जागा ?

फरहान अख्तरने त्याच्या सोशल मीडियावर याबाबतचा व्हिडिओ शेअर करत 'डॉन 3' ची घोषणा केली आहे.
'डॉन 3' ची घोषणा करत  व्हिडिओ रिलीज ; रणवीर सिंगने घेतली शाहरुखची जागा ?

"डॉन को पकडना मुश्किल ही नहीं नामुमकिन है…" खूप कमी लोक असतील ज्यांनी हा डायलॉग ऐकला नसेल. बॉलीवूडचा किंग खानच्या 'डॉन' आणि 'डॉन 2' या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले होते. शाहरुख खानच्या करिअरधील हे सुपरहिट सिनेमे मानले जातात. शाहरुखच्या या सिनेमातील भुमिकेने आणि अभिनयाने या चित्रपटांना एका वेळाल्याचं उंचीवर नेलं. गेल्या काही दिवसांपासून 'डॉन 3' या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. लवकरच 'डॉन 3' प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगितलं जात आहे. 'डॉन'च्या निर्मात्यांनी एक टीझर रिलीज करत 'डॉन 3' ची घोषणा केली आहे.

फरहान अख्तरने आता 'डॉन 3' ची घोषणा केली असून त्याने म्हटलं आहे की, 'डॉन 3' सोबत एक नवं पर्व घेऊन येत आहे. फरहान अख्तरने त्याच्या सोशल मीडियावर याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने 'डॉन 3' बद्दल सांगितलं आहे. चित्रपटच्या स्टारकास्टबद्दल फरहानने अद्यापी काही सांगितले नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. यावेळी 'डॉन 3' या सिनेमात शाहरुख खानची जागा रणवीर सिंग हा घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

'डॉन 3' ट्रेंडिंगला आला असून लवकरच याचा अधिकृत टीझर रिलीज करण्यात येणार आहे. 'गदर २' आणि 'डॉन 3' चा अधिकृत टीझर सारखाच रिलीज होणार असल्याचं सांगितलं जात आहे. २००६ मध्ये रिलीज झालेल्या 'डॉन' आणि २०११ साली रिलीज झालेल्या 'डॉन २' या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. आता 'डॉन 3' प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा सुरु असल्याने प्रेक्षकांती उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in