Video: आला 'ऑपरेशन व्हेलेंटाईन'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर, पुलवामा-सर्जिकल स्ट्राईकच्या आठवणी होणार जाग्या

पुलवामामध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकचा थरार आता आपल्याला रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Video: आला 'ऑपरेशन व्हेलेंटाईन'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर, पुलवामा-सर्जिकल स्ट्राईकच्या आठवणी होणार जाग्या

पुलवामामध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकचा थरार आता आपल्याला रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'ऑपरेशन व्हेलेंटाईन'या चित्रपटाचा ट्रेलर आज लाँच करण्यात आला आहे. २०१९ मध्ये १४ फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाइन डेच्या दिवशीच पुलवामामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांवर झालेला दहशतवादी हल्ला आणि त्याच्या प्रत्युत्तरात भारतीय हवाई दलाने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या घटनेभोवती या चित्रपटाचे कथानक आहे.

सलमान खानने लाँच केला ट्रेलर-

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या हातून या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. ट्रेलर शेअर करताना सलमानने कॅप्शनमध्ये 'जो होगा देखा जाएगा' चित्रपटाचा ट्रेलर लाँच करताना मला आनंद होत आहे, असे म्हटले आहे.

दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार चित्रपट-

'ऑपरेशन व्हॅलेंटाईन'चित्रपटाची कथा २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यावर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेता वरुण तेज आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर प्रमुख भूमिकेत दिसत आहेत.हा एक हाय-ऑक्टेन ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदी आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.एकीकडे सलमानने चित्रपटाचा ट्रेलर हिंदीत लाँच केला, तर दुसरीकडे राम चरणने तेलगू भाषेत या चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला आहे.

कधी होणार रिलीज?

या चित्रपटाचे दिग्दर्शिन शक्ती प्रताप सिंग यांनी केले आहे. हा चित्रपट १ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in