विद्या बालनच्या नव्या सिनेमाची घोषणा, प्रदर्शनाची तारीखही झाली जाहीर

विद्या बालनच्या आगामी चित्रपटाच्या पोस्टरचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला असून यावर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
विद्या बालनच्या नव्या सिनेमाची घोषणा, प्रदर्शनाची तारीखही झाली जाहीर

अभिनेत्री विद्या बालनने आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. विद्या बालन आणि इलियाना डिक्रूझ यांचा नवा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये विद्या, भारतीय मूळचा अमेरिकन अभिनेता सेंधिल राममूर्ति, प्रतीक गांधी आणि इलियाना डिक्रूझ स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 'दो और दो प्यार' असे या चित्रपटाचे नाव आहे. या आगामी चित्रपटाच्या पोस्टरचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला असून यावर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटात विद्या बालन, प्रतीक गांधी, इलियाना आणि सेंधिल राममूर्ती यांची मुख्य भूमिका असणार आहे. या चित्रपटाचे निर्माते अ‍ॅप्लॉज एंटरटेनमेंट आणि इलिपसिस एंटरटेनमेंट आहेत. निर्मात्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवरून पहिला लुक जारी केला आहे. सोबत लिहिले आहे.

या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "या सीझनमध्ये, प्रेम तुम्हाला आश्चर्यचकित करेल, तुम्हाला गोंधळात टाकेल..." अशा आशयाची पोस्ट करत,'दो और दो प्यार' 29 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल." हा चित्रपट 29 मार्च 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

'दो और दो प्यार' प्रेम, विनोद आणि नातेसंबंधांच्या प्रवासाभोवती फिरणारा चित्रपट आहे. पोस्टरमध्ये विद्या बालन हि सेंधिल राममूर्तीला मिठी मारताना दिसत आहे. दुसरीकडे, अभिनेता प्रतीक गांधी लीआना डिक्रूझसोबत पोज देताना दिसत आहे.

मोशन पोस्टर रिलीज झाल्यानंतर लगेचच चाहत्यांनी पोस्टरचे कौतुक करत लाईक्स आणि कमेन्टस् चा वर्षाव केला.

तत्पूर्वी, मंगळवारी विद्याने तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल उत्सुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत "दो और दो मिलेंगे. प्यार के राज खुलेंगे! उद्या सकाळी ११ वाजता, प्रतीक्षा करा!" असं कॅप्शन दिलं होतं.

याआधी विद्या हि गेल्या वर्षी तिच्या 'नियत' या सिनेमात दिसली होती. आता "दो और दो मिलेंगे या चित्रपटाच्या माध्यमांतून प्रेक्षकाच्या भेटीला येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in