खरंच रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडा पुढच्या महिन्यात साखरपुडा करणार?

गेल्या काही दिवसांपासून रश्मिका आणि विजय एकमेकांना डेट करत असल्याच्या आणि लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, या लग्नाबाबत रश्मिका आणि विजयच्या चाहत्यांना नाराज करणारी एक अपडेट येतेय.
खरंच रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडा पुढच्या महिन्यात साखरपुडा करणार?

विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदाना हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीचे स्टार आहेत. ते कायमच करिअरबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून रश्मिका आणि विजय एकमेकांना डेट करत असल्याच्या आणि लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा आहेत. यामूळे रश्मिका आणि विजयचे चाहते खूप खूश आहेत, मात्र या लग्नाबाबत रश्मिका आणि विजयच्या चाहत्यांना नाराज करणारी एक अपडेट येतेय.

पुढील महिन्यात अर्थात फेब्रुवारीमध्ये रश्मिका आणि विजय यांचा साखरपुडा होणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. तथापि, हे वृत्त खोटे असल्याचे दोघांच्या जवळच्या सूत्रांनी सोमवारी सांगितले. यासंदर्भात 'आयएएनएस'ने दोघांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला असता त्यांनी या बातम्यांना नकार देत, साखरपुड्यांच्या 'चर्चांबाबतचा रिपोर्ट खोटा आहे, असे स्पष्ट केले. या रिपोर्टनुसार, दोघे डेट करीत असले तरी त्यांनी त्यांचे नाते सार्वजनिक केलेले नाही.

विजय आणि रश्मिकाने 'गीता गोविंदम' आणि 'डियर कॉम्रेड' या चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. 'गीता गोविंदम' या सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली होती. त्यांची ऑन स्क्रीन जोडी चाहत्यांच्याही पसंतीस उतरली होती. दोघांना एकत्र वेळ घालवतानाही अनेकदा स्पॉट करण्यात आले आहे. त्यांच्या डेटिंग आणि लग्नाबाबतच्या चर्चा सतत होत असल्या तरी त्यांच्या लग्नाच्या बातमीसाठी मात्र चाहत्यांना अजून वाट बघावी लागणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in