विजय देवरकोंडा वाटणार १ कोटी रुपये ; कारण जाणून वाटेल अभिमान

विजय देवरकोंडा वाटणार १ कोटी रुपये ; कारण जाणून वाटेल अभिमान

विजय देवरकोंडा याने एका कार्यक्रमात या बद्दल जाहीरपणे एक घोषणा देखील केली आहे.

साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभू यांचा 'कुशी' हा चित्रपट १ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकवर्ग त्याच्या जोडीला भरभरून प्रेम देताना दिसत आहेत. बऱ्याच दिवसांनंतर विजयच्या चित्रपटला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. 'कुशी' चित्रपटाला प्रेक्षकांसोबतच समीक्षकांनीही समिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

'कुशी' या चित्रपटाचं दिग्दर्शिन शिव निर्वाण यांनी केलं आहे. हा चित्रपट तेलुगूसोबतच, तमिळ आणि हिंदीतही प्रदर्शित झाला आहे . या चित्रपटाने आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर खुप चांगली कमाई केली आहे. कुशी चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर विजय देवरकोंडाने त्याच्या चाहत्यांना एक मोठ वचन दिलं आहे. त्याने एका कार्यक्रमात त्या बद्दल जाहीरपणे एक घोषणा देखील केली आहे.

विजय देवरकोंडा नुकताच एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचला होता. या कार्यक्रमाचा हा व्हिडिओ ट्रेड अॅनालिस्ट आणि चित्रपट समीक्षक मनोबाला विजयबालन यांनी ट्विटरवर शेयर केला आहे. 'कुशी' चित्रपटातून कमावलेली रक्कम तो 100 कुटुंबांना देणार असल्याचं त्याने या व्हिडिओत सांगितलं आहे. त्याने तेलुगू भाषेत ही घोषणा केली आहे. या व्हिडिओत तो म्हणाला की, "आनंद व्यक्त करताना मला जाहीर करायचं आहे की, मी माझ्या कमाईतून मी 1 कोटी रुपये 100 वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये वाटणार आहे. यात प्रत्येक कुटुंबाला एक लाख रुपये मिळणार आहेत. हे सर्व पैसे मी माझ्या वैयक्तिक खात्यातून देणार आहे", त्याच्या या वाक्याने खूप लोकांनी त्याचे कौतुक केलं आहे.

'कुशी'च्या कमाईबद्दल बोलायचं झाल्यास पहिल्या दिवशी या चित्रपटाने तेलुगूमध्ये 15 कोटींची कमाई करत दमदार ओपनिंग केली होती. आता या सिनेमाने 60 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in