विजय-सामंथाच्या जोडीवर कौतुकांचा वर्षाव ; 'कुशी'ला मिळतोय तुफान प्रतिसाद

या सिनेमातून दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभू ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकाचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
विजय-सामंथाच्या जोडीवर कौतुकांचा वर्षाव ; 'कुशी'ला मिळतोय तुफान प्रतिसाद

सध्या एकामागोमाग एक ब्लॉकब्लस्टर सिनेमांची एन्ट्री होताना दिसत आहे. त्यात 'जेलर', 'गदर २', 'ओह माय गॉड २', 'ड्रीम गर्ल २' या चित्रपटांनीतर प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. अशात प्रेक्षक साउथचा मोस्ट अवेटेड रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'कुशी'ची तुरतेने वाट पाहत होते. या सिनेमातून दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभू ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकाचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

'कुशी' चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांना खुपच आवडली होती आणि आज अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात सामंथा आणि विजय यांची प्रेमकथा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन शिव निर्वाण यांनी केलं आहे. चित्रपट पाहून लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. समंथा-विजयची प्रेमकथा, चित्रपटाचं संगीत आणि कथा प्रेक्षकांना आवडते. हा चित्रपट तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये बनला आहे. अनेकांनी या चित्रपटाचा रिव्ह्यू ट्विटवर शेयर केला आहे.

एकानं लिहिलयं आहे की, "फर्स्ट क्लास चित्रपट आहे. कुशी सिनेमा ब्लॉकबस्टर ठरणार आहे." तर दुसऱ्याने लिहिलयं आहे की, "फर्स्ट हाफ संपला, क्यूट जोडी आहे, कॉमेडी सीन्स उत्तम आहेत, एकूणच हा चित्रपट चांगला आहे. चित्रपट पुर्ण मनोरंजन करणारा आहे, दोघांनीही कमाल कामगिरी केली आहे". चाहते सामंथा आणि विजय देवरकोंडा यांच्या चित्रपटावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in