मराठी मालिकेत विकास पाटील दिसणार नव्या रुपात

'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत विकास पाटील साकारणार स्वामीसुत
मराठी मालिकेत विकास पाटील दिसणार नव्या रुपात

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातून आणि वेगवेगळ्या मालिकांमधून घराघरात पोचलेलं नाव म्हणजे विकास पाटील . विकास पाटील सातत्यानं नव्या भूमिकांच्या शोधात असतो . मराठी मालिका आणि नाटकांमध्ये विविधांगी भूमिका साकारून त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे . आता तो पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एका नव्या भूमिकेत दिसणार आहे .

कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत नवी गोष्ट सुरु होणार आहे. स्वामी समर्थ यांच्या दिव्यतेचा अनुभव सगळ्यांनी प्रत्यक्षात अनुभवले असे नाही. पण, मालिकेत स्वामीसुत पर्वाचा आरंभ होणार आहे. जय जय स्वामी समर्थ मालिकेत विकास पाटील साकारणार आहे स्वामीसुत यांची भूमिका .

त्याबद्दल बोलताना तो म्हणाला, "हे खूप महत्वाचे पात्र आहे. कारण स्वामींनी त्यांना आपला मानसपुत्र मानले होता. तुम्हाला मालिकेत बघताना कळेलच कसा त्यांना स्वामींवर विश्वास नव्हता, पण हळूहळू स्वामींनी त्यांना आपल्या जवळ घेतलं,आणि कश्याप्रकारे त्यांचे आयुष्य बदलून गेलं. मी खुपचं उत्सुक आहे या भूमिकेबद्दल कारण मी स्वतः स्वामी भक्त आहे, आणि मला इतकं महत्वाचं पात्र करण्याची संधी मिळाली आहे हीच मी भाग्याची गोष्ट मानतो आणि त्यासाठी स्वामींनी माझी निवड केली यासाठी खूपच खुश आहे. खूप आव्हानात्मक आहे आधीचे हरिभाऊ आणि त्यानंतर स्वामीसुत... खूप साऱ्या गोष्टींचा विचार मी केला काळ वेगळा आहे त्यामुळे भाषेचा लहेजा, पोशाख असेल... खूप मोठी जबाबदारी आहे माझ्यावर, प्रेक्षक यावेळेस देखील भरभरून प्रेम करतील अशी आशा आहे मला".

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in