दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना ३० कोटीच्या फसवणूकप्रकरणी अटक

बॉलिवूडमधील दिग्दर्शक विक्रम भट्ट, त्यांच्या पत्नी श्वेतांबरी भट्ट आणि इतर सहा जणांवर ‘आयव्हीएफ’ फसवणूक प्रकरणात लूकआऊट नोटीस जारी झाल्यानंतर विक्रम भट्ट यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस पथकाने त्यांना मुंबईतील यारी रोड परिसरातील गंगा भवन अपार्टमेंटमधून पकडले, हे घर त्यांच्या मेहुणीचे आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : बॉलिवूडमधील दिग्दर्शक विक्रम भट्ट, त्यांच्या पत्नी श्वेतांबरी भट्ट आणि इतर सहा जणांवर ‘आयव्हीएफ’ फसवणूक प्रकरणात लूकआऊट नोटीस जारी झाल्यानंतर विक्रम भट्ट यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस पथकाने त्यांना मुंबईतील यारी रोड परिसरातील गंगा भवन अपार्टमेंटमधून पकडले, हे घर त्यांच्या मेहुणीचे आहे.

राजस्थान पोलीस आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त कारवाईत भट्ट यांना त्यांच्या मेहुणीच्या घरी ताब्यात घेण्यात आले. आता राजस्थान पोलीस त्यांना उदयपूरला हस्तांतरित करण्यासाठी वांद्रे न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांडची मागणी करणार आहेत.

डॉ. अजय मुरडिया (इंदिरा ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक) यांची ३० कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटकेच्या सात दिवस आधी उदयपूर पोलिसांनी विक्रम भट्ट, त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट यांच्यासह इतर सहा जणांवर लूकआउट नोटीस जारी केली होती. या नोटीसमध्ये सर्व आरोपींनी ८ डिसेंबरपर्यंत उदयपूर पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते आणि त्यांच्या परदेश प्रवासावरही बंदी घालण्यात आली होती.

२० दिवसांपूर्वी, ३० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा उदयपूरमध्ये विक्रम भट्ट आणि श्वेतांबरी भट्ट यांच्यासह आठ जणांवर नोंदवला गेला होता. या दाम्पत्याने डॉ. मुरडिया यांना २०० कोटी रुपयांच्या कमाईचे आमिष दाखवून फसवले. या प्रकरणाचा तपास भोपालपुरा पोलिसांकडून करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in