Vikram Gokhale Died… विक्रम गोखले यांची प्राणज्योत माळवली

चित्रपटसृष्टीतील हे नुकसान कधीही भरून न येणारे आहे. घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातून निवृत्ती घेतली होती.
Vikram Gokhale Died… विक्रम गोखले यांची प्राणज्योत माळवली

पुण्यातून एक वाईट बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखले यांच्यावर गेल्या १५ दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, बुधवारी त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली. विक्रम गोखले यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. चित्रपटसृष्टीतील हे नुकसान कधीही भरून न येणारे आहे. घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातून निवृत्ती घेतली होती. सध्या ते नवोदित कलाकारांना अभिनयाचे प्रशिक्षण देण्याचे कामही करत होते. विक्रम गोखले यांची महत्त्वाची भूमिका असलेला ‘गोदावरी’ हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in