"मराठी माणूस कुठेही आणि कितीही व्यस्त असला तरी..."; मानसी साळवीसोबत खास गप्पा

मला असे वाटते कलेला कोणत्या प्रकारचे बंधन नसते. मला मराठीमध्ये काम तर करायचं आहे. कारण आपण मराठी आहोत.
"मराठी माणूस कुठेही आणि कितीही व्यस्त असला तरी...";    मानसी साळवीसोबत खास गप्पा
PM

मला असे वाटते कलेला कोणत्या प्रकारचे बंधन नसते. मला मराठीमध्ये काम तर करायचं आहे. कारण आपण मराठी आहोत. पण मला कुठंतरी असे वाटते की, आपले जे मराठी कॉन्टेन्ट क्रिएटर्स आहेत त्यांना असे वाटते की मला मराठीमध्ये काम करायला वेळ नाही आहे. तर मी त्यांना सांगू इच्छिते की , मराठीमध्ये मला काम करायचे आहे आणि मराठी माणूस कुठेही कितीही व्यस्त असला तरी मराठीसाठी तो नेहमीच उपलब्ध असतो, असे प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री मानसी साळवी हिने म्हटले आहे. नुकतेच मानसीने तिचा मराठी ते हिंदी मालिकेचा प्रवास कसा होता, हे 'नवशक्ती'ला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितले.

"मी खूप आधी जरी मराठी मालिका केल्या असल्या तरी, मग ती 'असंभव' असो वा 'काय घडलं त्या रात्री' ही मालिका असो, प्रेक्षकांना अजून ते सगळे आठवतेय. प्रेक्षकवर्ग मला शुभ्रा म्हणूनच ओळखतात आणि शुभ्राची ओळख पुढे कुठे तरी सुरु ठेवावी असे वाटत होते. त्याचवेळी माझ्याकडे 'गुम है किसीके प्यार मे' ही हिंदी मालिका आली आणि त्या मालिकेमध्ये डॉ . ईशा भोसलेच्या भूमिकेमध्ये मी चंद्रकोर बिंदी लावते. मग मी म्हटले कुठे ना कुठे तरी आपण ती एक झलक ठेवावी आणि खास म्हणजे हिंदी मालिका असूनही आम्हाला मराठीमध्ये डायलॉग बोलायला मिळतात आणि त्या मालिकेमध्ये मराठी संस्कृती असलेले कुटुंब दाखवले आहे. त्यामुळे मी खूप भाग्यवान आहे की मला दोन्ही संस्कृती बघायला मिळत आहेत.

चाहते जेव्हा मला भेटतात तेव्हा..

मला खूप छान वाटते. जेव्हा कोण ओळखीचे नसलेले लोकं मला भेटायला येतात. तेव्हा मला असे वाटतंच नाही की, ते लोक अनोळखी आहेत. ते माझ्यासोबत खूप गप्पा मारतात. टीव्ही एक असे माध्यम आहे की जे 'मास कॉम्म्युनिकेशन'चा एक प्रकार आहे. टीव्हीमुळे तुम्ही घराघरात पोहोचता आणि एक आश्चर्याची गोष्ट अशी की, मी मास्क लावून जरी कुठे गेले तरी लोक मला माझ्या आवाजाने देखील मला ओळखतात आणि तुम्ही टीव्हीमध्ये येता ना ?असे प्रश्न विचारतात. ही खूप महत्वाची गोष्ट आहे की लोक मला फक्त माझ्या आवाजानेही ओळखत आहेत.

काम आणि घर कसे सांभाळते?

आपण खूप नशिबवान आहोत की स्री म्हणून जन्म घेतला आहे. आपण स्रीया एकावेळी अनेक काम करू शकतो. आपल्याला टाईम मॅनेजमेंट कसे करायचे हे चांगले माहिती आहे आणि आपण आपल्या मुलांनाही तेवढाच वेळ देतो. तसेच आपल्या कामाला देखील आपण तेवढाच वेळ देतो. त्यामुळे हे नैसर्गिकरित्या आपल्याला येते, असे मला वाटते. प्रत्येकाला कामासोबतच जबाबदारीही सांभाळावी लागते. टीव्हीचे जे पण काय आहे ते माझ्यासाठी काम आहे आणि माझी मुलगी ओमिषा ही माझी जबाबदारी आहे. देवाच्या कृपेने माझे सगळे बरोबर मॅनेज होते.

माझ्या फिटनेस मागचे रहस्य -

माझ्या मते प्रत्येक स्री ही सुंदर असते. पण, लाईफस्टाइलमध्ये काही बदल आपल्याला करावे लागतात. अर्थातच मी आता साखर किंवा बाहेरचे पदार्थ खाणे टाळते. मी फक्त घरचंच जेवण करते. मी शाकाहारी आहे आणि त्यासोबतच खूप मेहनतीही आहे. माझ्या घरातही माझी मुलगी आहे आणि मला असे वाटते की मुले आपल्याला बघून शिकतात म्हणून मी फिट राहते.

...म्हणून काढला 'इन अवर टीम्स' शो -

मला असे वाटते आजच्या काळात आपण कामामध्ये खूप व्यस्त आहोत. तर, मला असे वाटते की पालकांना मुलांना पाहिजे तेवढा वेळ देता येत नाही. याशिवाय अनेक पालकांना आपल्या मुलांबरोबर सेक्सशुल ओरिएन्टेन्स, सोशल ओरिएन्टेन्स अशा विषयांवर बोलणे जमत नाही. म्हणून मी हा शो काढला आहे, जेणेकरून या गोष्टी आपण नॉर्मली बोलू शकतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in