
सलमान खानचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. सलमान खानचा 'टायगर 3' हा चित्रपट दिवाळीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता 'टायगर 3' सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये सलमान खानचा अॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे. या व्हिडिओत टायगर सांगतो की, त्याने 20 वर्षे भारताचे रक्षण केले पण बदल्यात त्याला देशद्रोही म्हटले जात आहे. हा टीझर पाहिल्यानंतर सलमानच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. या चित्रपटाच्या कलेक्शनबाबत चाहत्यांनी आधीच अंदाज बांधायला सुरुवात केली आहे.
या टीझरमध्ये सलमान खानच्या दमदार अॅक्शन ने सिनेप्रेक्षकांसह सर्वांना भूरळ घातली आहे. या चित्रपटात सलमान खान भारताच्या रॉ एजंटची भूमिका साकारत आहे, कतरिना पाकिस्तानची रॉ एजंट असलेली कतरिना त्याच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. मात्र, या टीझरमध्ये कतरिना दाखवलेली नाही. विशेष म्हणजे लग्नानंतर कतरिना कैफचा सलमानसोबतचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाचे दोन भाग आधीच रिलीज झाले आहेत. 2012 मध्ये सलमान खान आणि कतरिनाचा 'एक था टायगर' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यानंतर 2017 मध्ये 'टायगर जिंदा है' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. आता सलमानचे चाहते 'टायगर 3' या त्यांच्या आगामी सिनेमाची आतूरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा १० नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मनीष शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.
टायगर-३ या सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यानंतर काही वेळातच चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. यात एका वापरकर्त्याने लिहिले की, ओपनिंग डे वर 100 कोटी आणि 1000 कोटी कलेक्शन हा चित्रपट करणार आहे. मी जगभर बोलत नाही. यात सलमान खान आणि टायगर खूप जवळ येतील असे दिसते. मी याची हमी देऊ शकतो. तर दुसर्याने लिहिले की, अरे देवा. मी वेडा होणार आहे. कारण 'टायगर 3' चा टीझर मार्कपर्यंत आहे. मन फुंकणारे. उत्तम कृती. या दिवाळीत सलमान खान सर्व रेकॉर्ड मोडेल. या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान आणि कतरिनाची लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. त्यामुळे दोघांचे चाहते फार उत्सुक आहेत.