... तर चित्रपटगृहांसमोर आंदोलन करून चित्रपट बंद पाडू, 'गांधी गोडसे एक युद्ध' वाद चिघळणार ?

चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमात लोकांनी निर्मात्यांना काळे झेंडे दाखवले आणि घोषणाबाजी केली
... तर चित्रपटगृहांसमोर आंदोलन करून चित्रपट बंद पाडू, 'गांधी गोडसे एक युद्ध' वाद चिघळणार ?

'गांधी गोडसे एक युद्ध' हा चित्रपट 26 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. मात्र या चित्रपटावरून वाद निर्माण झाल्याचे दिसत आहे. या चित्रपटात नथुरामला खलनायक म्हणून दाखवण्याचा प्रयत्न झाल्यास चित्रपटगृहांसमोर आंदोलन करून चित्रपट बंद पाडू, असा इशारा अमर हुत्तमा हिंदू महासभेने दिला होता. त्यानंतर मुंबईत लोकांनी या चित्रपटाला विरोध केला आहे. या चित्रपटाची निर्मिती राजकुमार संतोषी यांनी केली आहे.

शुक्रवारी चित्रपट निर्माते चित्रपटाचे प्रमोशन करत असताना त्यांना काही लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमात लोकांनी निर्मात्यांना काळे झेंडे दाखवले आणि घोषणाबाजी केली. तिथे इतका विरोध झाला की निर्मात्यांना पोलिसांना पाचारण करावे लागले. आंदोलकांनी आरोप केला आहे की चित्रपटात महात्मा गांधींना कमी लेखले आहे आणि त्यांचा मारेकरी नथुराम गोडसे यांचा गौरव केला आहे.

राजकुमार संतोषी 'गांधी गोडसे: एक युद्ध' या चित्रपटातून गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसेचा गौरव करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. निर्मात्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अयशस्वी ठरले आणि शेवटी त्यांना पोलिसांची मदत घ्यावी लागली.

या संदर्भात निर्मात्यांनी एक निवेदनही जारी केले आहे. प्रचार कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. दिग्दर्शक, निर्माते राजकुमार संतोषी यांनीही 'गांधी गोडसे : एक युद्ध' या चित्रपटात गोडसेचा गौरव केला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in