'गदर २' बाबत पाकिस्तानी नागरिकांना काय वाटत ? म्हणाले, "त्याला एकदा..."

'गदर 2' या चित्रपटाने केवळ भारतातच नाही तर जगभरात धुमाकूळ घातला असून प्रेक्षकांनी या सिनेमाला अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे.
'गदर २' बाबत पाकिस्तानी नागरिकांना काय वाटत ? म्हणाले, "त्याला एकदा..."

बॉलीवूड सुपरस्टार सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा 'गदर २' हा चित्रपट ११ ऑगस्टला रिलिज झाला असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा सिनेमा रेकॉर्डवर रेकॉर्ड मोडत चालला आहे. 'गदर 2' या चित्रपटाने केवळ भारतामध्ये नाही तर जगभरात धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांनी या सिनेमाला अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. या चित्रपटाची कथा भारत आणि पाकिस्तानातील वाद, युद्ध आणि प्रेम कहानी अशी आहे.

गदरच्या पहिल्या भागामध्ये भारत- पाक फाळणीनंतर तारा सिंग हा त्याची पत्नी सकिनाला घ्यायला पाकिस्तानात गेला होता. आणि आता 'गदर 2' मध्ये तो त्याच्या मुलाला घ्यायला गेला आहे. आता तारा सिंग पाकिस्तानात गेल्यानंतर शांततेत परत येईल तो तारा सिंग कसला? त्याने तिथे पुन्हा तोडफोड केली. भारतात तर 'गदर 2' पाहताना हिंदुस्थान झिंदाबादचे नारे लागले आहेत. मात्र, पाकिस्तानात 'गदर 2' या चित्रपटाबद्दल लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत. याची देखील चर्चा झाली आहे.

नुकताच, सोशल मिडियावर पाकिस्तानचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात पाकिस्तानी लोकांनी 'गदर 2' बद्दल त्यांची प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाकिस्तानमधील एका यूट्यूबरने सनी देओलच्या 'गदर 2' या चित्रपटाबद्दल पाकिस्तानी लोकांच्या काही प्रतिक्रिया घेतल्या. यात यूट्यूबरने एकाला विचारले की, "जर चित्रपटात सनी देओल आपल्या पाकिस्तानी लोकांना मारत असेल तर आपण काय करावे?" यावर एक व्यक्ती म्हणतो की, "हे सगळं चित्रपटांमध्ये दाखवलं जात आहे'. त्याला एकदा इकडे यायला सांगा मग आम्ही त्याला सांगू. इथले पाकिस्तानी लोक किती धाडसी आहेत ते."

तर युटूबर दुसऱ्याला विचारतो की, "त्याचा अडीच किलोचा हात आहे?" यावर तो म्हणतो की, "तो खोटं बोलतो त्याने मेक-अप करून सिक्स पॅक बनवले आहेत, त्याला इकडचे लोक सोडणार नाही. अश्या अनेक फनी प्रतिक्रिया पाकिस्तानमधील लोकांनी 'गदर 2' बाबत दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in