Gharat Ganapati: गणरायाच्या आगमनाची गोष्ट दाखवणारा 'घरत गणपती' सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

Marathi Movie: मायेने आणि आपलेपणाने माणसं जोडणाऱ्या घरत कुटुंबातील ‘श्री गणराया’च्या आगमनाच्या वेळी घडणारी गमतीशीर गोष्ट चित्रपटात पहायला मिळणार आहे.
Gharat Ganapati: गणरायाच्या आगमनाची गोष्ट दाखवणारा 'घरत गणपती' सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

Gharat Ganapati Movie Release Date: कुटुंब हा प्रत्येकाचा जवळचा विषय आहे. प्रत्येकालाच कुटुंब हवं हवंस वाटतं. कुटुंब म्हणजे प्रेम, जिव्हाळा,स्नेह , नाती अशा अनेक गोष्टी असतात. हेच सगळं नेहमीच आपली मराठी चित्रपटसृष्टी पण दाखवतं असते. मराठी चित्रपटांतूनही कौटुंबिक विषय अतिशय उत्तमतेने हाताळलेले आपण पाहतो. अशीच एक नवीन कुटुंबाविषयीची कथा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. 'घरत गणपती' हा चित्रपट २६ जुलैला मराठी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. आंबे, सुपारी, केळी, फणसाच्या बागा, काजू, कोकमाची झाडं असा निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणाच्या पार्श्वभूमीवर घडणारी घरत कुटुंबाची मजेशीर गोष्ट आपल्याला आगामी 'घरत गणपती' या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज हे नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत.

काय बघायला मिळेल?

नातेसंबंधातील प्रेम, गोडवा आपल्या सणांच्या माध्यमांतून अधिक दृढ होत असतो. मायेने आणि आपलेपणाने माणसं जोडणाऱ्या घरत कुटुंबातील ‘श्री गणराया’च्या आगमनाच्या वेळी घडणारी गमतीशीर गोष्ट चित्रपटात पहायला मिळणार आहे. अतिशय सुंदर कथाविषय, त्याला अभिनयसंपन्न कलाकारांची जोड यातून एक उत्तम कलाकृती दिग्दर्शक नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर आपल्यासमोर घेऊन येत आहेत. त्याआधी ‘घरत गणपती’ चित्रपटाचे आकर्षक पोस्टर आणि पहिली झलक आपल्यासमोर आली आहे.

कोणते कलाकार साकारत आहेत भूमिका?

निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, डॉ.शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग,आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर,दिव्यलक्ष्मी मैस्नाम अशी कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत.

कोण आहेत निर्माते?

कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.

'प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची' ही गोष्ट असून नातेसंबंधांचा सुरेख गोफ या चित्रपटात विणला आहे. जो प्रत्येकाच्या मनाला भावेल, त्यामुळेच पॅनोरमा स्टुडिओज ‘घरत गणपती’ चित्रपटाच्या सोबत भक्कमपणे उभे असल्याचे पॅनोरमा स्टुडिओजचे मॅनेजिंग डिरेक्टर कुमार मंगत पाठक यांनी सांगितले. नॅविअन्स स्टुडिओ निर्मित या चित्रपटाच्या वर्ल्ड वाइड वितरणाची जबाबदारी पॅनोरमा स्टुडिओजने सांभाळली आहे तसेच चित्रपटाच्या म्युझिकची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in