Yami Gautam: यामी गौतम आणि आदित्य धरने मुलाचे नाव ठेवले 'वेदविद' या खास नावाचा अर्थ जाणून घ्या

Yami & Aditya Dhar Baby Name: यामी गौतम आणि आदित्यच्या घरी नुकतेच एका छोट्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. या जोडप्याने मुलाचे 'वेदविद' असे हटके नाव ठेवले आहे.
Yami Gautam baby name Vedavid meaning
Instagram

Yami Gautam baby name Vedavid meaning: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम आणि भारतीय चित्रपट निर्माता आदित्य धर यांच्या हे बॉलिवूडच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला या जोडप्याने यामी गरोदर असल्याची घोषणा केली होती. आता, नुकतेच दोघांनी आपल्या घरी छोट्या पाहुण्यांचे आगमन झाल्याची माहिती देत एक पोस्ट केली आहे. त्यांच्या चाहत्यांना सर्वात खास बातमीने आनंद झाला आहे. २० मे रोजी यामी गौतमने तिच्या सोशल मीडिया हँडलवर अधिकृतपणे घोषणा केली की तिला मुलगा झाला आहे. मुलाचे नावही तिने सांगितले आहे. यामी आणि आदित्यने त्यांच्या चिमुकल्याचं नाव 'वेदविद' असते ठेवले आहे, ज्याची खूप चर्चा होत आहे.

काय आहे अभिनेत्रीची पोस्ट?

अभिनेत्रीने एक फोटो पोस्ट केली आहे ज्यामध्ये लिहले आहे की, " आमच्या लाडक्या मुलाच्या आगमनाची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. १० मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आम्हाला मुलगा झाला. 'वेदविद' असा आमच्या बाळाचं नाव आम्ही ठेवत आहोत. कृपया त्याला तुमच्या सर्व प्रकारचे आशीर्वाद आणि प्रेम द्या. विनम्र, यमी आणि आदित्य"

यामी गौतम आणि आदित्य धरने मुलाच्या आगमनाची घोषणा करत पोस्टला कॅप्शन दिले होते, 'आम्ही सूर्या हॉस्पिटलच्या अद्भुत डॉक्टरांचे, विशेषत: डॉ. भूपेंद्र अवस्थी आणि डॉ. रंजना धनू यांचे मनापासून आभार मानू इच्छितो, ज्यांच्या कौशल्याने आणि अथक प्रयत्नांमुळे हा आनंदाचा प्रसंग शक्य झाला.' त्यांनी पुढे लिहिले की, 'आम्ही पालक बनण्याच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करत असताना आमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. तो आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी तसेच आपल्या प्रिय देशासाठी अभिमानाचे प्रतीक बनेल या आशेने आणि आत्मविश्वासाने पूर्ण आहोत.'

काय आहे 'वेदविद' नावाचा अर्थ?

वेदविद म्हणजे 'वेद जाणणारा'. हे भगवान विष्णू, भगवान शिव आणि भगवान राम यांचे देखील नाव आहे.

या जोडप्याने त्यांचे नाते जगापासून लपवून ठेवले होते आणि त्यांनी जून २०२१मध्ये हिमाचल प्रदेशमध्ये लग्नगाठ बांधून त्यांच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले. दरम्यान, यामीला शेवटचे कलम ३७० मध्ये गुप्तचर अधिकारी म्हणून पाहिले गेले होते. हा चित्रपट एक आकर्षक ॲक्शन पॉलिटिकल ड्रामा आहे. दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदित्य सुहास जांभळे यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in