Emergency Release Date: प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी रिलीज होणार कंगना राणौतचा 'इमर्जन्सी'

Kangana Ranaut: दोनदा तारीख बदलल्यानंतर कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या रिलीजची तारीख निश्चित झाली आहे. या सिनेमात कंगना इंदिरा गांधींची भूमिका साकारणार आहे.
Emergency Release Date: प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी रिलीज होणार कंगना राणौतचा 'इमर्जन्सी'
@kanganaranaut/ Instagram
Published on

Kangana Ranaut's Emergency Movie Release Date Out: इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित कंगना राणौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कंगनाची या चित्रपटाची गेल्या वर्षभरापासून प्रतिक्षा होती. चित्रपटाच्या रिलीजची तारीख दोनदा पुढे ढकलण्यात आली होती. आता अखेरीस रिलीजची निश्चित तारीख समोर आली आहे. कंगना राणौतने स्वतः या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून ती या चित्रपटाची निर्माती आणि दिग्दर्शिका देखील आहे. या चित्रपटात कंगनाशिवाय अनुपम खेर, मिलिंद सोमण आणि सतीश कौशिक हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

कंगना दिसणार इंदिरा गांधींच्या भूमिकेत

कंगना राणौतने नुकतीच निवडणूक जिंकून लोकसभा खासदार बनत तिचं राजकीय करिअर सुरु केले आहे. तिने नुकतीच लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली आहे. याच दरम्यान आता अभिनेत्रीने तिच्या आगामी 'इमर्जन्सी' या चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर करत चाहत्यांना एक मोठी खुशखबरही दिली आहे. तिने चित्रपटाचं पोस्टर आणि तारीख सांगत पोस्ट केली आहे. पोस्टरमध्ये अभिनेत्री इंदिरा गांधींच्या लूकमध्ये दिसत आहे.

दोनदा बदलली तारीख

मणिकर्णिका फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेला ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट सुरुवातीला २४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार होता. नंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ७ महिन्यांनी पुढे ढकलण्यात आली आणि तो १४ जून २०२४ रोजी सिनेमागृहात दाखल होणार होता. मात्र कंगना राणौतच्या निवडणूक दौऱ्यामुळे ही तारीखही पुढे ढकलण्यात आली होती.

चित्रपट कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?

कंगना राणौतने चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहले की, 'स्वतंत्र भारत के सबसे काले अध्याय के 50वें वर्ष की शुरुआत।'. यातून समजते की या चित्रपटात १९७५ मधील भारतातील सर्वात वाईट आणीबाणीची गाथा सांगितली जाणार आहे. या कॅप्शनसोबत हा चित्रपट ६ सप्टेंबर २०२४ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त भागाची स्फोटक कथा यामध्ये आहे अशी चर्चा होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in