स्वतःच्या वयाच्या दुप्पट वय असलेल्या व्यक्तीशी लग्न, ४ महिन्याचे बाळ गमावले... एवढं भोगल्यानंतर आता 'ही' अभिनेत्री करणार नवी सुरुवात

स्नेहल ही 23 वर्षाची असताना तिने तिच्यापेक्षा 21 वर्ष मोठ्या असलेल्या राजकीय नेत्याशी लग्न केलं होतं.
स्वतःच्या वयाच्या दुप्पट वय असलेल्या व्यक्तीशी लग्न, ४ महिन्याचे बाळ गमावले... एवढं भोगल्यानंतर आता 'ही' अभिनेत्री करणार नवी सुरुवात

'इश्क का रंग सफेद' या मालिकेतील अभिनेत्री स्नेहल रायने काही दिवसांपूर्वी तिच्या लग्नाबद्दल खुलासा केला होता. आतापर्यंत तिने तिच्या लग्राविषयी कमालीची गुप्तता पाळली होती. स्नेहल ही 23 वर्षाची असताना तिने तिच्यापेक्षा 21 वर्ष मोठ्या असलेल्या राजकीय नेत्याशी लग्न केलं होतं. माधवेंद्र राय असं स्नेहलच्या पतीचं नाव असून आता तिच्या लग्नाला 10 वर्षे पुर्ण झाली आहेत. आतापर्यंत तिने लग्नाबाबत कुठेही वाच्यता केली नव्हती. ई- टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने लग्न तसंच बाळंतपणाबद्दल मोठे खुलासे केले आहेत.

या मुलाखतीत तिने लग्नानंतर ती एका मुलाची आई झाली. पण आजारपणामुळे तिने आपल्या बाळाला गमावल्याचं सांगतलं. लग्नानंतर तिला बाळ झालं. पण बाळ चार महिन्याचं असताना एका आजारपणामुळे तिने आपल्या बाळाला गमावलं. त्या बाळाचे नाव रुद्र असल्याचं सांगत त्याच्या आठवणीत रुद्रकल्प क्रिएशन्स ही एनजीओ सुरु करणार असल्याचं ती म्हणाली. तसंच माझा मुलगा जिथे असेल, ती जागा खूप सुंदर असेल, अशी मला आशा असल्याचं देखील ती म्हणाली.

याबाबत बोलताना स्नेहलने त्यावेळच्या आठवणीना उजाळा दिला आहे. त्यावेळी आपण नैराश्यात गेल्याचं सांगत "मी स्वत:ला आठवडाभर एका खोलीत कोंडून घेतलं होतं. फक्त वॉशरुम जायचे व माझ्या बेडवर बसून राहायचे. जेवायचे नाही. माझ्यासाठी हे आयुष्य संपलं होतं. आयुष्यात सर्वकाही चांगलं सुरु आहे असं वाटतं तेव्हा सगळ उलट घडू लागतं. एक मूल गमावणं शंभर मृत्यूंसारख आहे. माझं वजन 40 किलो झालं होते. माझ्या एका मित्राने मला यातून बाहेर काढलं. माझ्या शरीराचा सांगाडा झाला होता. मेकप करणं देखील मला पाप वाटत होतं. जगाला चेहरा कसा दाखवायचा असा प्रश्न मला पडायचा. माझी मैत्रीण मला मरीन ड्राईव्हला न्यायची आणि रडायला, व्यक्त व्हायला सांगायची. एका आश्रमात गेल्यावर एका मुलाने मला मिठी मारल्यानंतर 'आई' असं म्हटल्यावर मला पुन्हा जगण्याची इच्छा झाली". असा खुलासा स्नेहलने केला आहे.

आपल्या लग्न तसंच पतीच्या वयाबद्दल बोलताना तीने वयात अंतर असून देखील आपण आनंदी असल्याचं सांगितलं. बाळ गमावल्यानंतर पतीने आपल्याला खूप सांभाळलं तसंच स्वत:ला व्यस्त ठेवण्यास सांगितलं. आपण लग्नाबाबत कोणाला सांगितलं नाही. तो काळ खूप कठीण होता. मात्र, आता मी मजबूत झाली असून सर्वकाही शेअर करु शकते, त्यामुळे लग्नाबाबत खुलासा केला असल्याचं तिने म्हटलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in