IMDb: गेल्या दहा वर्षात कोणत्या भारतीय कलाकारांना सर्वात बघितले गेले?

IMDb: गेल्या दहा वर्षात कोणत्या भारतीय कलाकारांना सर्वात बघितले गेले?

Indian Actor & Actress: आयएमडीबीने गेल्या दशकातील टॉप १०० सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांच्या नावांची घोषणा केली.

IMDb’s Top 100 Most Viewed Indian Stars: आयएमडीबी या मूव्हीज, टीव्ही‌ आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज गेल्या दशकातील टॉप १०० सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांच्या नावांची घोषणा केली व ही नावे जगभरातील IMDb च्या २५ कोटींहून अधिक मासिक व्हिजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजच्या आधारे निर्धारित केली गेली.

शाह रूख खानसोबत ओम शांती ओममध्ये २००७ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेली दीपिका पदुकोन ही IMDb वरील गेल्या १० वर्षांमधील सर्वाधिक बघितली गेलेली भारतीय कलाकार ठरली आहे. चित्रपट उद्योगातील तिच्या जवळजवळ दोन दशके लांब अशा कारकिर्दीमध्ये तिने अनेक ब्लॉकबस्टर्समध्ये भुमिका केली आहे व त्यामध्ये कॉकटेल, ये जवानी है दीवानी, आणि पद्मावत व इतर भुमिकांचा समावेश आहे. तिने २०१७ मध्ये हॉलीवूडमध्ये xXx: रिटर्न ऑफ एक्सेंडर केजसह पदार्पण केले व त्यामध्ये तिने व्हीन डिझेल.सोबत काम केले.

“जगभरातील प्रेक्षकांच्या भावनांच्या आधारे बनवल्या गेलेल्या यादीमध्ये समावेश झाल्याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे,” असे पदुकोनने म्हंटले. “IMDb हे कलाकार आणि चित्रपटप्रेमींसाठी विश्वसनीयतेचे प्रतीक आहे व त्यामध्ये लोकांच्या आवडीची खरी नस, त्यांची मते व त्यांचे प्राधान्यक्रम प्रतिबिंबित होतात. ही मान्यता मिळणे अतिशय अभिमानाची गोष्ट आहे व त्यामुळे मला श्रोत्यांकडून मिळालेल्या प्रेमाची परतफेड करण्यासाठी ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन अधिक काम करण्याची प्रेरणा देते.” आता ती कल्की २८९८ एडी मध्ये दिसेल (जो २७ जून २०२४ रोजी रिलीज होईल), आणि ह्या वर्षी तिचा सिंघम अगेनसुद्धा रिलीज होईल.

“अनेक वर्षांपासून मनोरंजनाचे चाहते त्यांच्या आवडत्या कलाकारांबद्दल अपडेटेड राहण्यासाठी IMDb चा आधार घेत आहेत. ही विशिष्ट यादी विश्वसनीय आकडेवारीवर आधारित आहे व गेल्या दशकाच्या अवधीमध्ये भारताच्या मनोरंजनाच्या जगामध्ये झालेल्या बदलांची दखल त्यामध्ये घेण्यात आली आहे,” असे IMDb इंडियाच्या प्रमुख यामिनी पतोडीया ह्यांनी म्हंटले. “जगभरातील भारतीय कलाकारांना असलेल्या विलक्षण लोकप्रियतेला आम्ही सेलिब्रेट करत असताना IMDb चाहत्यांना नव्याने समोर येणा-या व प्रस्थापित प्रतिभेसोबत अधिक खोलवर कनेक्ट करण्यासाठी मदत करत राहील.”

IMDb वरील गेल्या दशकातील सर्वाधिक बघितले गेलेले भारतीय कलाकार

1. दीपिका पदुकोन

2. शाह रूख खान

3. ऐश्वर्या राय बच्चन

4. आलिया भट्ट

5. इरफान खान

6. आमीर खान

7. सुशांत सिंह राजपूत

8. सलमान खान

9. हृथिक रोशन

10. अक्षय कुमार

11. कतरिना कैफ

12. अमिताभ बच्चन

13. समंथा रूथ प्रभू

14. करीना कपूर

15. तृप्ती डीमरी

16. तमन्ना भाटिया

17. रनबीर कपूर

18. नयनतारा

19. रणवीर सिंह

20. अजय देवगन

गेल्या दशकातील IMDb ची टॉप १०० सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची यादी ही जानेवारी २०१४ ते एप्रिल २०१४ मधील IMDb च्या साप्ताहिक रँकिंगच्या आधारे निर्धारित झाली आहे. IMDb वेबसाईटवर दर महिना येणा-या २५ कोटींहून अधिक जागतिक व्हिजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजच्या आधारे हे रँकिंग निर्धारित झाले आहे. IMDb वरील १०० नावांची पूर्ण यादी इथे बघता येऊ शकते.

उल्लेखनीय आहे की, १०० कलाकारांच्या यादीमध्ये हिंदी, तमिल, तेलुगू, मल्याळम आणि कन्नडा चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा समावेश आहे. ५४ व्या स्थानी असलेल्या कमल हासनची, ह्या यादीमधील सर्वाधिक काळापासून सुरू असलेली कारकिर्द आहे आणि त्याने १९६० मध्ये बाल कलाकार म्हणून पदार्पण केले होते. १५ व्या क्रमांकावर असलेल्या तृप्ती डिमरीने २०१७ मध्ये पदार्पण केले व ती ह्या यादीतील सर्वांत नवीन कलाकार आहे. इरफान खान (क्र. ५) आणि सुशांत सिंह राजपूत (क्र. ७) हे दोन्हीही लोकप्रिय कलाकार २०२० मध्ये वारले व त्यांनी उत्तम कलाकृतींचा वारसा मागे ठेवला आहे.

logo
marathi.freepressjournal.in