कोण होणार विजेता? आज पार पडणार 'बिग बॉस १७' चा ग्रँड फिनाले

बिग बॉस १७ कोण जिंकणार हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना उत्सुकता आहे.
कोण होणार विजेता? आज पार पडणार 'बिग बॉस १७' चा ग्रँड फिनाले
PM

सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉस १७ या रिॲलिटी शोचा आज (रविवारी) भव्य फिनाले रंगणार आहे.

अंकिता लोखंडे, मुनावर फारुकी, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार, अरुण मॅशेटे हे स्पर्धक यंदाच्या सीझनमध्ये टॉप ५ मध्ये आहेत. अंकिता ,अभिषेक ,अरुण ,मन्नारा आणि मुनावर यांच्यापैकी बिग बॉस १७ ची ट्रॉफी कोण जिंकणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

अंकिताचा पती विक्की जैन बाहेर गेल्यानंतर, जिओ सिनेमावर या पाच जणांसाठी लाइव्ह वोटिंग प्रक्रिया सुरु झाली आहे. वोटिंग लाईन्स आज दुपारी १२ वाजता बंद होतील. आता वोटिंग ट्रेंडनुसार मुनावर फारुकी सध्या टॉपवर असून अंकीता लोखंडे, अभिषेक कुमार बॉटम २ मध्ये आहेत. कलर्स चॅनलवर आज (२८ जानेवारी ) रोजी बीबी १७ ग्रँड फिनाले होणार आहे. एकूण बिग बॉस १७ चा हा सहा तासांचा कार्यक्रम असेल कारण ग्रँड फिनाले संध्याकाळी ६ वाजता सुरू होईल आणि मध्यरात्री १२ दरम्यान विजेत्याचे नाव घोषित केले जाईल.

logo
marathi.freepressjournal.in