Wild Wild Punjab: ४ मित्र, हार्टब्रेक आणि पंजाबच्या जंगलाची राइड! लवकरच होणार 'वाइल्ड वाइल्ड पंजाब’चा प्रीमियर

Upcoming Punjabi Film: आगामी पंजाबी भाषेतील कॉमेडी चित्रपटाचे दिग्दर्शन सिमरप्रीत सिंग करत आहेत आणि अंकुर गर्ग आणि लव रंजन यांची निर्मिती आहे.
Wild Wild Punjab: ४ मित्र, हार्टब्रेक आणि पंजाबच्या जंगलाची राइड! लवकरच होणार 'वाइल्ड वाइल्ड पंजाब’चा प्रीमियर

Comedy Film of Netflix: तुम्ही कधी कोणावर प्रेम केले आहे का? तुमचे हृदय कधी कोणी तोडले आहे का? मग 'वाइल्ड वाइल्ड पंजाब' हा चित्रपट तुमच्यासाठीच आहे. मैत्री ब्रेकअपला बरे करते असे मानणाऱ्यांसाठी आणि प्रत्येक हृदय-तुटलेल्या प्रियकरासाठी हा चित्रपट आवश्यक आहे. वाइल्ड वाइल्ड पंजाबमध्ये वरुण शर्मा, मनजोत सिंग आणि सनी सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट जुलै २०२४ ला प्रदर्शित होणार आहे.

काय आहे कथा?

या चित्रपटात चार तरुणांची कथा आहे ज्यांनी संपूर्ण पंजाबमध्ये ट्रीपला जाण्याचा निर्णय घेतला, ज्याला ते "ब्रेक-अप ट्रीप" म्हणतात, ते त्यांच्या ब्रेकअपमधून स्वत: ला बरे करण्याच्या आशेने या ट्रिपला निघतात. पण त्यांच्या या ट्रिपमध्ये जे काही घडते हे बघण्यासारखे आहे.

कधी आणि कुठे पाहायचा चित्रपट?

नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. १० जुलै २०२४ रोजी चित्रपटाचा प्रीमियर होईल. हा चित्रपट प्रेम, मैत्री, ब्रेकअप आणि अशा बरेच काही या विषयांवर आधारित आहे.

कोण आहेत कलाकार?

वरुण शर्मा, मनजोत सिंग आणि सनी सिंग यांच्यासोबत या चित्रपटात इशिता राज शर्मा, जस्सी गिल आणि पत्रलेखा यांच्याही भूमिका आहेत. आगामी पंजाबी भाषिक कॉमेडी चित्रपटाचे दिग्दर्शन सिमरप्रीत सिंग करत आहेत आणि लव फिल्म्स प्रॉडक्शन अंतर्गत अंकुर गर्ग आणि लव रंजन निर्मिती करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in