'आदिपुरुष' ओटीटीवर आपली जादू दाखवणार? 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'आदिपुरुष' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील संवाद, व्हिएफएक्स आणि कलाकारांच्या वेशभूषेवरुन मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाले होते.
'आदिपुरुष' ओटीटीवर आपली जादू दाखवणार? 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

१६ जून २०२३ रोजी प्रदर्शित झालेला 'आदिपुरुष' हा चित्रपट सुरुवातीपासूनच वादात सापडला होता. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर यातील संवाद, व्हिएफएक्सवरुन बरेच वाद झाले होते. तसंच चित्रपटातील कलाकारांच्या वेषभूषेवरुन देखील बरीच टीका करण्यात आली होती. या सिनेमातील कलाकार प्रभास, सैफ अली खान व क्रिती सेनॉन यांच्या लुकवरून चांगलीच चर्चा रंगताना दिसून येत होती. या चित्रपटाली संवादांवरुन सर्वात जास्त वाद निर्माण झाले होते.

'आदिपुरुष' हा सिनेमा महाकाव्य रामायणावर आधारित आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभासने रामाची, तर अभिनेत्री क्रिती सेननने सीता मातेची भूमिका साकारली आहे. तसंच सनी सिंगने या सिनेमात लक्ष्मणाची, तर अभिनेता सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे. मराठी कलाकार देवदत्त नागेने या सिनेमात हनुमानाची भूमिका साकारली आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळ्या ओम राऊत यांनी केलं आहे.

'आदिपुरुष' या चित्रपटाने पाहिल्याचं दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. मात्र, त्या नंतर हा सिनेमा अपेक्षेप्रमाणे कमाई करु शकला नाही. चित्रपटातील वेशभूषा, संवाद, व्हिएफएक्स यामुळे प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली. यामुळे चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये सातत्याने घट पाहायला मिळाली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जरी अपयशी ठरला असला तरी प्रेषक डिजिटल प्लॅटफॉर्मवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. लवकरच 'आदिपुरुष' हा सिनेमा ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. तसंच या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात अली आहे. हा चित्रपट ऑगस्टमध्ये ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदिपुरुष हा चित्रपट १ ऑगस्ट २०२३ पासून OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in