बॉलिवूडच्या लोकप्रिय कपलमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचं नावं आघाडीवर असतं. अनुष्का आणि विराट नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर या जोडप्याबद्दल एक बातमी चांगलीच व्हायरल होत आहे.
'हिंदुस्तान टाईम्स' ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
बॉलीवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय संघाचा आघाडीचा क्रिकेटपटू विराट कोहली लवकरच त्यांच्या चाहत्यांना एक गोड बातमी देणार आहे. अनुष्का आणि विराट त्यांच्या दुसऱ्या मुलाचं स्वागत करणार आहे. 'हिंदुस्तान टाइम्स'च्या रिपोर्टनुसार, अनुष्का आणि विराट हे दोघे दुसऱ्यांदा आई बाबा होणार आहेत. अनुष्का तिची दुसरी प्रेग्नेंसी खूप एन्जॉय करत आहे. अनुष्का शर्मा तीन महिन्याची प्रेग्नंट असल्याचं सध्या बोललं जातं आहे.
अनुष्का शर्मा ही बऱ्याच दिवसांपासून कोणत्याचं कार्यक्रमात दिसली नाही. ती सध्या सार्वजनिक कार्यक्रमांपासून लांब असून ती तिच्या प्रेग्नेंसीवर अधिक लक्ष देतं आहे.
काही दिवसांआधी अनुष्का आणि विराट मुंबईतील एका क्लिनिकमध्ये दिसले होते. त्यावेळी त्यादोघांनी पापाराझींना फोटो आणि व्हिडिओ पोस्ट न करण्याची विनंती केली होती.
अनुष्का शर्मा सध्या मीडियाच्या लाइमलाइटपासूनही दूर असल्याने या अफवा पसरल्या आहेत. ही बातमी खरी असल्यास अनुष्का आणि विराट लवकरच चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेयर करतील, अशी अपेक्षा दोघांचे चाहते करत आहे. सध्या दोघांनीही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.