नाना पाटेकर, तनुश्री दत्ता यांच्यातील वाद पुन्हा ऐरणीवर? तनुश्री दत्ता म्हणाली...

तनुश्रीने नुकताच आदिल खानसोबत प्रसार माध्यमांशी संवद साधला यावेळी तिने राखीवर गंभीर आरोप केले आहेत.
नाना पाटेकर, तनुश्री दत्ता यांच्यातील वाद पुन्हा ऐरणीवर? तनुश्री दत्ता म्हणाली...

गेल्या अनेक दिवसांपासून राखी सावंत आणि आदिल खान यांच्यात वाद सुरु आहेत. आता या वादात तनुश्री दत्ता यांनी उडी घेतली आहे. तनुश्रीने नुकताच आदिल खानसोबत प्रसार माध्यमांशी संवद साधला यावेळी तनुश्रीने राखीवर गंभीर आरोप केले. राखीमुले दोन मुलांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक आरोप तनुश्रीने राखी सावंतवर केला. यावेळी तीने मीटुबद्दल बोलताना नाना पाटेकरांवर देखील गंभीर आरोप केले.

या पत्रकार परिषदेत तनुश्री दत्ताला विवेक अग्निहोत्री आणि नाना पाटेकर यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने हे आरोप केले. "ज्या लोकांमुळे तुझ करिअर खराब झालं. त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळत आहे. विवेक अग्निहोत्रींच्या 'द व्हॅक्सीन वॉर' चित्रपटात नाना पाटेकर आहेत", असा प्रश्न तनुश्रीला विचारण्यात आला. यावेळी तिने नाना पाटेकर यांच्यावर आरोप केले आहेत.

तमुश्री दत्ता म्हणाली, "नाना पाटेकर आणि विवेक अग्निहोत्रींबाबत आपण का बोलत आहोत?त्यांच्यावर बोलून मला त्यांना प्रसिद्धी द्यायची नाही. त्यांना आजही त्यांचे चित्रपट चालवण्यासाठी माझी गरज पासते. नाना पाटेकरांबरोबर माझ २००८ मध्ये बांडण झालं होतं. तेव्हा देखील त्यांच्या चित्रपट चालला नव्हता. त्यांचे चित्रपट चालत नाहीत. तेव्हा ते माझ्यासारख्या लोकांकडे येतात. जेणेकरुन, मी त्यांच्या चित्रपटात आयटम साँग करेन आणि त्यांचे चित्रपट चालतील."

मीडिया तनुश्रीला त्यांच्या चित्रपटांबाबत काही प्रश्न विचारेल आणि त्यांचे चित्रपट चालतील. मी काहीतरी बोलेन ज्यांच्यामुळे त्यांच्या चित्रपटाला प्रसिद्धी मिळते. त्यांच्या चित्रपटाला मला कोणत्याही पद्धतीने प्रसिद्धी द्यायची नाही, असंही तनुश्री म्हणाली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in