Animal First Day Earnig: रणबीरच्या 'अ‍ॅनिमल'ने मोडला सर्वांचा रेकॉर्ड; ठरला ओपनिंग डे-ला सर्वाधिक कमाई करणारा पहिला चित्रपट

दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाची सध्या सर्वत्र हवा सुरु आहे.
Animal First Day Earnig: रणबीरच्या 'अ‍ॅनिमल'ने मोडला सर्वांचा रेकॉर्ड; ठरला ओपनिंग डे-ला सर्वाधिक कमाई करणारा पहिला चित्रपट

अभिनेता रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. रिलीजच्या पहिल्यात दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. या सिनेमातील रणबीर कपूच्या अभिनयाचा प्रेक्षकांकडून सध्या कौकू सुरु आहे. 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बंपर कमाई केली आहे.

दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाची सध्या सर्वत्र हवा सुरु आहे. या चित्रपटाने ३३.९७ कोटी रुपयांच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगसह पठाण, टायगर ३, आणि गदर २ या चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले आहेत. तसंच या चित्रटाने रेकॉर्डच्या पहिल्याच दिवशी कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे.

एका रिपोर्टनुसार 'अ‍ॅनिमल'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी ६१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यापैकी हिंदी भाषेत ५० कोटींची, तर तेलुगू भाषेत १० कोटींचं कलेक्शन केलं आहे. तमिळमध्ये या सिनेमाने ०.४ कोटी, तर कन्नडमध्ये ०.०९ आणि मल्याळम भाषेत या सिनेमाने ०.०१ कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे.

'अ‍ॅनिमल'ने मकाईच्या आकड्यांमुळे शाहरुख खानच्या पठाण, सनी देओलच्या गदर २ आणि सलमान खानच्या टायगर ३ चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. पठाण या चित्रपटाने ओपनिंग डेला ५७ कोटींची कमाई केली होती. तर सनी देओलच्या गदर २ या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४०.१० कोटींची कमाई केली होती. सलमान खानच्या टायगर ३ या चित्रपटा पहिल्या दिवशी ४४. ५० कोटींची कमाई केली होती. दरम्यान, 'अ‍ॅनिमल' हा रणबीर कपूरच्या करिअरमधील ओपनिंग डेला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या सिनेमात रणबीर कपूरसोबतच रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल या कलाकारांनी देखील महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in