Article 370 Teaser : यामी गौतमीचा 'आर्टिकल 370' चा टीझर आऊट; 'या' दिवशी येणार चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला

Article 370 Teaser : यामी गौतमीचा 'आर्टिकल 370' चा टीझर आऊट; 'या' दिवशी येणार चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला

या चित्रपटात यामी गुप्तहेर खात्यातील एक अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे.
Published on

बॉलिवूडची अभिनेत्री यामी गौतम सध्या 'आर्टिकल 370' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात यामी गुप्तहेर खात्यातील एक अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. हा सिनेमा 'आर्टिलक 370' म्हणजेच जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा हटवण्याच्या स्टोरीवर आधारित आहे. या ट्रेलरमध्ये यामी गौतम दहशतवाद्यांशी लढताना दिसत आहे. निर्मात्यांनी शुक्रवारी सिनेमाचे पोस्टर पोस्ट केले होते आणि काल ट्रेलर रिलिज केला आहे. त्यानंतर या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे.

यामीची भूमिका पाहाण्यासाठी चाहते झाले उत्सुक-

चित्रपटाचा टिझर जियो स्टुडिओजच्या युट्युब चॅनेलवरती रिलीज करण्यात आला. 'आर्टिकल 370' चे दिग्दर्शन आदित्य सुहास जंभाले यांनी केले आहे. आदित्यने याआधी 2019 मध्ये ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' या सिनेमाचेही दिग्दर्शन केले होते. 'बदलापूर', 'उरी', 'बाला', 'ए थर्सडे' आणि 'चोर निकल के भागा' यांसारख्या चित्रपटात यामीने प्रमुख भूमिका निभावली आहे. आता चाहते गुप्तहेर खात्यातील तिची भूमिका पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. बदलापूरमध्ये यामीचा रोल फार कमी कालावधीचा होता. उरीमध्येही तिने गुप्तहेर भारतीय सैन्याचा भाग म्हणून काम केले होते. त्यामुळे यामीकडे अशा सिनेमांमध्ये काम करण्याचा विशेष अनुभव देखील आहे.

'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला-

'आर्टिकल 370' च्या टीझरमध्ये यामी गौतम एका अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. या टीझरमध्ये यामी म्हणते, "दहशतवाद एक धंदा आहे. जो स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या भ्रष्ट राजकीय नेत्यांद्वारे चालवलो जातो. हे भ्रष्ट अधिकारी आणि नेते स्व:त वारेवाप पैसा कमावतात", याशिवाय संपूर्ण सिनेमा 'आर्टिकल 370' रद्द करण्याच्या मागणीवर आधारीत आहे. वास्तविकते प्रमाणे सिनेमातही जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करुन त्याला केंद्रशासित प्रदेश बनवले जाते. हा चित्रपट 23 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in