प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा यांचे निधन

बॉलिवूड दिग्दर्शक दिवंगत यश चोप्रा यांच्या जडणघडणीत पामेला यांचा मोठा वाटा होता, त्यांनी पार्श्वगायनही केले आहे
प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा यांचे निधन

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक दिवंगत यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा यांचे आज वयाच्या ७४व्या वर्षी निधन झाले. यश चोप्रा आणि यशराज फिल्म्सच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता. त्या अभिनेत्री राणी मुखर्जी यांची सासू तर प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांच्या आई आहेत. तसेच, त्या उत्तम पार्श्वगायिकादेखील होत्या. तसेच त्यांनी चित्रपटांमध्ये लेखन आणि निर्मात्याची भूमिकादेखील बजावली आहे.

पामेला यांनी १९७०मध्ये यश चोप्रा यांच्याशी लग्न केले होते. हे लग्न अगदी पारंपरिक पद्धतीने केले होते. त्यांना आदित्य आणि उदय चोप्रा अशी २ मुले आहेत. आदित्य चोप्रा हे नाव बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक आहे. तर, उदय चोप्रानेदेखील काही चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर यशराज इंटरनॅशनलमध्ये निर्मात्याची भूमिका बजावत आहे. पामेला चोप्रा या नेटफ्लिक्सवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द रोमॅंटिक्स' या डॉक्युमेंटरीमधेय दिसल्या होत्या.

logo
marathi.freepressjournal.in